निळा येथे शालेय व्यवस्थापन समिती निवड..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे आज शालेय समितीची स्थापना करण्यात आली.मुख्याध्यापक श्री चोंडे सर आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी त्या समंधीची लेखी सूचना 267 विध्यार्थ्याच्या पालकांना दिली होती.त्या प्रमाणे आज सकाळी ठीक 9 वाजता कोरम अभावी संख्या नसल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली आणि समिती गठीत करण्यासाठी वेळ 10:00 वाजता ठेवण्यात आली.तशी सूचना मंदिरावरील ध्वनीक्षेपकवरून देण्यात आली.

सर्व पालकांच्या सहमतीने 2022 ते 2024 साठी पुढील प्रमाणे सझमिती गठीत करण्यात आली.

1)अध्यक्ष-  शिवाजी भाऊराव जोगदंड.

2)उपाध्यक्ष - शंकर अमृतराव कदम.

3)गोविंदराव नारायण हिंगोले सदस्य

4)स्वाती व्यंकटराव हिंगोले

5)विजयकुमार पांडुरंग हिंगोले

6)किशन एकनाथराव जोगदंड

7)अनंता गजानन थंडवे

8)द्रोपदा श्यामराव जोगदंड

9)मनिषा रमेश थंडवे

10)माधव दत्ता हिंगोले

11)अनिता दत्ता गिरी

12)गंजेवार विद्या लक्ष्मणराव

13)सचिव श्री चोंडे निळकंठ माधवराव

      ही समिती 10 मार्च 2024 पर्यंत कार्यरत राहीन.समितीची निवड पारदर्शी करण्यासाठी वरिष्ठ प्राथमिक शाळा पुयनी चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री पडगिलवार सर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री नरवाडे सर यांनी खूप मोठे सहकार्य केले. नवीन सर्व सदस्यांचे माजी अध्यक्ष श्यामसुंदर जोगदंड यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.


             निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या जयंती निमित्त उपस्थित सर्व मान्यवर,माजी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, उपस्थित सर्व पालक वर्ग आणि निळा गावच्या सरपंच आणि पालक आदरणीय कोमल रोहित हिंगोले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

          मुख्याध्यापक श्री चोंडे यांनी सर्वांचे आभार मानले तर निवडणूक प्रक्रियेच्या कामाचे सूत्रसंचलन पोहरे कैलास पिराजी यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)