'शब्दक्रांती ' ला राज्यस्तरीय अक्षरोदय साहित्य पुरस्कार प्रदान..

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या क्रांतीसूर्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या उत्तम कानिंदे आणि रमेश मुनेश्वर यांनी संपादित केलेल्या 'शब्दक्रांती' प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्रचा राज्यस्तरीय 'अक्षरोदय साहित्य पुरस्कार ' नुकताच प्रदान करण्यात आला.


पिपल्स काॅलेज नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिका मंगलाताई फुलारी, ग्रामीण कथाकार दिगंबर कदम, जेष्ठ रंगकर्मी डॉ.विजयकुमार माहुरे, प्रसिद्ध कवी समीक्षक देविदास फुलारी, राज्याध्यक्ष मारोती मुंडे, संयोजक सदानंद सपकाळे उपस्थित होते. रमेश मुनेश्वर यांनी सदर पुरस्कार स्विकारला.


क्रांतीसुर्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पहिल्याच साहित्यकृतीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, गझलकार मधु बावलकर, शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड, मनिषा बडगीरे, नाना पांचाळ, मोहन जाधव, प्रा. डॉ. पंजाब शेरे, सांगावाकर महेंद्र नरवाडे,  एडवोकेट मिलिंद सर्पे, पत्रकार गोकुळ भवरे, प्रा. गजानन सोनोने, सुरेश पाटील, मिलिंद जाधव, रुपेश मुनेश्वर, सुमेध घुगरे, राजेश पाटील, मारोती काळबांडे, शेषेराव पाटील, राजा तामगाडगे, मिलिंद कंधारे, रामस्वरूप मडावी,  आदीनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)