देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारण्यात येणार

शालेयवृत्त सेवा
0

 


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

वाचनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी! देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी आज पार पडलेल्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या(बालभारती) बैठकीत येत्या आर्थिक वर्षासाठी रु.५ कोटींची तरतूद करण्यात आली.


या संग्रहालयात अनेक प्राचीन आणि दुर्मिळ पाठ्यपुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. याद्वारे पाठ्यपुस्तकांचा उद्देश, रचना, वैशिष्ट्य, स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास करणे शक्य होईल. बालभारतीच्या ग्रंथालयात १८३७ पासूनची पाठ्यपुस्तके जपून ठेवली आहेत. याशिवाय भारतातील अन्य राज्यातील पाठ्यपुस्तकेही एकत्र करण्याचा आमचा मानस आहे. आजच्या बैठकीत सन २०२२-२३ या वर्षाकरिता रु. ४२९.६५ कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत सदर तरतूद ही ८% अधिक आहे. 


दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे आगामी वर्षापासून  इयत्ता ११वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल या  विषयाकरिता प्रयोगवही (Journal) बालभारतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी पर्यावरण शिक्षण, जलसुरक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांसाठी प्रयोगवह्या दिल्या जात होत्या. त्याप्रमाणेच भूगोल याविषयासाठी प्रयोगवही उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी अनेक शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)