प्रसाद पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने पुरोगामीचे नेते कै. ल. रा. जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार संघटनेचे राज्याध्यक्ष, दि. प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे संचालक प्रसाद पाटील यांना सपत्नीक पुरोगामीचे नेते कै. ल. रा. जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार रत्नागिरी येथे  नुकताच देण्यात आला.


   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपेश जाधव  रत्नागिरी जिल्हाध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे , महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव आदी उपस्थित होते.  त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने  पाच हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल  त्यांचे अभिनंदन राज्य नेते विजय भोगेकर,राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे,राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, विभागीय अध्यक्ष शिवशंकर सोमवंशी,संघटक युसुफ शेख, सचिव परशुराम कौसल्ये,उपाध्यक्ष श्रीराम कलणे.


जिल्हा नेते ग.नु जाधव,नांदेड जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे ,जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा मुख्य संघटक जे .डी. कदम, राज्य कार्याध्यक्ष सुनंदा कल्याणकस्तुरे, जिल्हा अध्यक्ष कविता गरुडकर, जिल्हा सरचिटणीस पल्लवी नरंगले, जिल्हा प्रमुख सल्लागार बी.टी.केंद्रे, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश मोकले , माहुर तालुकाध्यक्ष एस एस पाटील,किनवट तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर, हदगाव तालुकाध्यक्ष नागनाथ गाभणे, भोकर केशव कदम ,कंधार तालुकाध्यक्ष मोबिन शेख, नांदेड तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड, मुदखेड जी.बी.मोरे, अर्धापुर संजय कोंडवाडे,लोहा परमेश्वर रासवते,हिमायतनगर ईश्वर निळेगावे, आदीनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)