प्राथमिक शिक्षकांंच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागू करावी प्रहार शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदन.

शालेयवृत्त सेवा
0

 



 नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) : 

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांंच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टळावा यासाठी वेतन प्रक्रियेतील टप्पे कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीएमपी प्रणालीद्वारे वेतन करावेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.रा.गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना प्राथमिक शिक्षक वेतनासाठी सीएमपी प्रणाली सुरु करणेबाबत ई-मेल द्वारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनाही निवेदन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना नंदुरबार शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील यांंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहेत.  


जिल्ह्यातील  प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास दरमहा होणारा विलंब टाळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागु करावी. कारण जिल्हा परिषद आस्थापने अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन एका क्लिकवर अदा होते. मात्र जिल्ह्यातील मोठी आस्थापना असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या  वेतनाची तरतुद अर्थ विभागातुन गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. स्थानिक पंचायत समिती स्तरावरील अनेकविध अडचणींमुळे जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या वेतनास नेहमीच विलंब होतो . 


वेतन विलंबामुळे प्राथमिक शिक्षकांना बँकेचे, पतसंंस्थेेचे तसेच इतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने  प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले असून याबाबत प्रशासन अनुकुल असून देखील याबाबत ठोस अंमलबजावणीस विलंब होत आहे. तरी या पार्श्वभूमीवर जिल्हयातील  प्राथमिक  शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)