नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जून 2022 मध्ये पहिलीमध्ये प्रवेश पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रम राज्यभर चालू आहे. या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण ही झाले आहेत. शाळापूर्वतयारी अभियानाचा एक भाग म्हणून शाळा स्तरीय मेळावा घेऊन प्रवेश पात्र बालकांचे व पालकांचे स्वागत करण्यासाठी भोकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला .या मेळाव्याचे उद्घाटन श्री गुरुदेव सेवा मंडळ स्मारक समिती भोकर येथील समाजसेविका श्रीमती निर्मलाताई यांच्या हस्ते झाले.
अतिथी म्हणून जे.एम. शेख मुख्याध्यापक नरसिंग पसनुरवार,विलास गायकवाड आदी होते. यावेळी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले. सकाळी प्रभातफेरी काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. पालकांना उपक्रम साहित्य वाटप करून मेळावा क्रमांक दोनच्या पूर्वी बालकांचे शाळापूर्वतयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरसिंग पसनुरवार, संचलन मिलिंद जाधव तर आभार कांचन जोशी यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक विलास गायकवाड, रमेश खांडरे, मोहीनी बाचेवाड, अनिता डुबे, बालाजी डुबे आदी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .