जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे सातवीतील विद्यार्थ्यांना दिला निरोप...

शालेयवृत्त सेवा
0

 


     

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे सातवीतील विद्यार्थ्यांना  दिला निरोप. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक श्री चोंडे एन.एम.तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्णेवार मॅडम,पाम्पटवार मॅडम, मोखंडपल्ले मॅडम,वाघमारे मॅडम,आणि पोहरे सर हे होते

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गंजेवार मॅडम,आणि आभार प्रदर्शन श्रीमती रत्नपारखी मॅडम यांनी केले तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक श्रीमती पांडे मॅडम वर्गशिक्षिका या होत्या.


          इयत्ता सातवीतील जवळपास सर्वच मुलांनी आपल्या भावनां रडत रडत व्यक्त केल्या.पांडे मॅडम यांना तर बोलताच येत नव्हते त्या अक्षरश: रडत होत्या आणि जवळपास सर्व शिक्षक आणि विदयार्थी यांना या अगळ्या वेगळ्या भावनिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली.

    कर्णेवार मॅडम : विध्यर्थ्यांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करत पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. मोखंडपल्ले मॅडम :खूप अभ्यास करा,स्पर्धा परीक्षा पास व्हा इंग्रजी ला मित्र माना आणि स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.

         रत्नपारखी मॅडम : तालुका स्तरीय विज्ञान स्पर्धा आणि दरवर्षी शाळास्तरावर घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातून नंबर काढून त्यांना त्यांच्या मार्फत बक्षिसे देण्यात आली.रजिस्टर आणि पेन तर प्रोत्साहन पर सर्वच विध्यार्थ्यांना सुद्धा पेन देण्यात आल्या.

   वाघमारे मॅडम : माझ्या सर्व लाडक्या विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शैक्षनिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

        पाम्पटवार मॅडम :सर्व विध्यर्थ्याना पुढील शिक्षणासाठी हसर्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या..

       गंजेवार मॅडम : या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे पांडे मॅडम आणि गंजेवार मॅडम निरोप देणाऱ्या आणि निरोप घेणाऱ्या वर्गशिक्षिका बोलत होत्या आणि रडत ही होत्या

या पेक्षा सुंदर चित्र पुन्हा बघायला मिळेल की नाही सांगता येणार नाही..पांडे मॅडम यांच्या कडून सातवी तील सर्व मुलांना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले तर सातवीतील मुलांनी आपली आठवण म्हणून शास्त्रज्ञ् न्यूटन यांचा सुंदर फोटो शाळेला भेट दिला.


       पोहरे सर :आज जग विनाशाच्या वाटेवर येऊन ठेपले आहे आणि त्याचा कधी विस्फ़ोट होईन सांगता येणार नाही म्हणून तुम्ही डॉ. इंजि.बन न्यापूर्वी एक अदर्ष नागरिक बना आणि आमच्या आजच्या अश्रूची किंमत जर चुकवायची असेल तर खूप शिका.. आणि अश्या ठिकाणी भेट होऊ दया ज्या ठिकाणी तुम्ही स्वबळावर चार चाकी वाहणात बसून आमच्या समोरून जाल आणि आम्ही अभिमानाने सांगू की हा आमचा विध्यार्थी आहे..


म्हणून रागावर नियंत्रण मिळवा, आईवडिल आणि आजी आजोबा यांचे ऐका फिरून अपशब्द वापरू नका. खूप खूप मोठे व्हा.खूप पुस्तके थोरांची चरित्र वाचा. 

दिवसामागून दिवस सरले

चार वर्षे लगेच सरले

दिवस उजाडला निरोपाचा

आता सारे काही आठवणीत उरले

बघुनी घेऊ जगलेले..

क्षण सारे गोड मनाशी,

गाठू सारे उत्तुंग यश शिखरे,

झेप घेऊनि आकाशी...


श्री चोंडे सर :अध्यक्षीय समारोप करताना आदरणीय श्री चोंडे सर सुधा खूप गहिवरून गेले. आमच्या शाळेतील सर्वात हुशार विध्यार्थी आज आमची शाळा सोडून जात आहेत या गोष्टींचे आम्हाला वाईट वाटते.खूप शिका,चांगला अभ्यास करा,आपले आणि आपल्या गावाचे नाव गाजवा असा मौलिक संदेश दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)