एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल नंदुरबार येथे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



 नंदुरबार ( गोपाल गावित ) :

नवोदय विद्यालयातील इ. ६ वीत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल नंदुरबार येथे घेण्यात आली. परिक्षा प्रमुख तथा प्राचार्य विलास रघुनाथराव केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली परीक्षेला एकूण ३५४ विद्यार्थी बसले आहेत. एकूण ३० वर्गात नियोजन करण्यात आले होते. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळा बंद केल्या. मात्र जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन भरून ठेवले होते. प्रवेश हाॅल तिकीट तपासणी करून मुलांना प्रवेश देण्यात आला होता. यासाठी पोलिस हवालदार सूरेश वसावे यांनी उत्तमरित्या चोख बंदोबस्त करून परीक्षा उत्साहात संपन्न झाल्या. 


आता ही परीक्षा होईल की नाही या बाबत शंका होती. मात्र आदेशानुसार अखेर आज शनिवारी परीक्षा संपन्न झाली. शिक्षण विभागाने कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणालाही परीक्षा केंद्राचे आवारात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच दोन बाकांमधील अंतर व गर्दी होणारच नाही याची खबरदारी घेतली होती. परीक्षेच्या अगोदरच परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घेतले होते. यामुळे परीक्षा व्यवस्थित पार पडण्यास कोणतीही अडचण आली नाही. अनेक अडथळे पार करीत अखेर ही परीक्षा झाली. 


अनेक दिवस रखडलेली आणि अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अखेर विविध केंद्रावरील नेटके नियोजन आणि नियोजनाप्रमाणे कार्यवाहीमुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडली. विद्यार्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. यामुळे पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागाने ही सुटकेचा निश्वास सोडला. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी व पालकांसाठी एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूलतर्फे उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी परीक्षा केंद्रात घेण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)