खासदार डॉ.हिनाताई गावीत यांच्या हस्ते दलेलपूर जि.प.शाळेत शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन. .

शालेयवृत्त सेवा
0

 


   

नंदुरबार ( गोपाल गावित ) 

तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साही,आनंदी वातावरणात संपन्न झाला. प्रेरणास्थान सतीश चौधरी शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प नंदुरबार, मार्गदर्शक शेखर धनगर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तळोदा, अलका जयस्वाल केंद्रप्रमुख केंद्र तळोदा, शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे अध्यक्षस्थानी डॉ.हिनाताई गावीत खासदार संसदरत्न ,नंदुरबार लोकसभा मतदार संघ, प्रमुख पाहुणे रामानंद ठाकरे नगरसेवक नगरपरिषद तळोदा, दिपक पाडवी सामाजिक कार्यकर्ते तळोदा, रेखाताई वसंत पाडवी सभापती पं. स. तळोदा, देवेंद्र पाडवी, पोलिस पाटील दलेलपूर, सुत्रसंचलन, प्रास्ताविक नितिन महाजन सर प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. 


उदघाटन नंदूरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न डॉ.हिनाताई गावीत यांच्या हस्ते फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थीनी व ग्रामस्थांनी आदिवासी नृत्य ग्रामपंचायत भवन ते शालेय आवार ढोल तालावर सादर करून केले. टेबल क्रमांक १ ते ७सर्व माहिती सर्व मान्यवरांना देण्यात आली. व दाखल पात्र विद्यार्थी यांच्या शाळापूर्व तयारीची नोंदी टेबल क्रमांक नुसार घेण्यात आली. 


अध्यक्षीय भाषणात संसदरत्न खासदार हिनाताई गावीत यांनी आपल्या मनोगतात शाळापूर्व तयारीची आवश्यकता व गरज याविषयीची विद्यार्थी व पालक माता यांना समजावून दिले व त्यांची शिक्षणासाठीची धडपड, आस्था हे त्यांनी एकलव्य विद्यालयाची संकल्पना यातून समजावून दिली. विशेष सहकार्य राजू प्रधान ,अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती दलेलपूर  संतोष मराठे, अजय धानका आकाश धानका पप्पु धानका राजेश मराठे, शालेय व्यवस्थापन समिती, सदस्य गण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सोहनी मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजु प्रधान , सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई, आशाताई, गावातील तरुण स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. समारोप व आभार कार्यक्रमच्या शेवटी उपस्थितांचे आभार बलदेव पवार, विषय शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक  शाळा दलेलपूर यांनी केले. व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)