नंदुरबार ( गोपाल गवित ) :
शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष आनंदराव पाटील हे नियत वयोमानाने दि.३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने परिवर्धा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी संतोष पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ जि.प.शाळा परिवर्धा येथे घडवून आणला. सदरील सेवापूर्ती सोहळ्याला अध्यक्षस्थानी मोहनभाऊ शेवाळे जि.प. सदस्य हे उपस्थित होते.
तर प्रमुख उपस्थिती डी.टी.वळवी गटशिक्षणाधिकारी प.स. शहादा, उषा पेंढारकर माजी व निवृत्त गटशिक्षणाधिकारी, जगदीश पाटील, मनोज कदम, अनंतराव महिरे, केंद्रशाळा परिवर्धाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, सुरेश ठाकरे शा.व्य.समिती अध्यक्ष तऱ्हाडी, आनंदराव राजपूत शिक्षण प्रेमी तऱ्हाडी, गोपाळ गावित जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना , मंगेश पाटील, संतोष पाटील यांची आई वत्सलाबाई आनंदराव पाटील तसेच संतोष पाटील यांचे सर्व कुटुंब आई,पत्नी,भाऊ,मुले,सुनबाई उपस्थित होते.
सुरवातीला संतोष पाटील यांच्या जीवनकार्याचा व केलेल्या सेवेचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम अलट यांनी केले. केंद्रातील सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते संतोष पाटील यांचा सहकुटुंब सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. त्यानंतर केंद्रप्रमुख संतोष पाटील यांच्या कामाबद्दलचे अनुभव आपल्या मनोगतातून शिक्षकांनी व्यक्त केले. मीना पाटील, मनीषा शिवदे, स्नेहल गुगळे, आधार मोरे, शक्ती धनके, मनोज राठोड, नरेंद्र कुवर, गुलाब राठोड, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
तदनंतर व्यासपीठावरील मान्यवर डी.टी.वळवी, उषा पेंढारकर, जगदीश पाटील, गोपाळ गावीत, मोहनभाऊ शेवाळे यांनी संतोष दादा यांच्या कार्याबद्दल आपल्या मनोगतातून व्यक्त झाले. “ माणूस हा त्याच्या पदापेक्षा त्याच्या कामावरून मोठा दिसतो. असेच संतोष पाटील याचं काम आहे.संतोष पाटील केंद्रपमुख म्हणून कोणत्याही शाळेत गेले तर ते अगोदर कार्यालयात न जाता थेट वर्गात जावून विद्यार्थ्यांसोबत बसून गप्पा मारतात, त्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांत रमून जातात. असा अधिकारी शिक्षकांसोबत विध्यार्थ्यांना पण खुप आवडतो.
नेहमी शिक्षकांच्या अडचणींत त्यांना मदत करणे, प्रशासन व्यवस्थित सांभाळणे हे कौशल्य केंद्रप्रमुख म्हणून सहज पार पाडणारे केंद्रप्रमुख संतोष आनंदराव पाटील यांच्या निवृत्त होण्याने नक्कीच शिक्षण क्षेत्रात एक चांगल्या अधिकाऱ्याची कमतरता जाणवेल.” असे सर्व मान्यवर व्यक्त झाले. तर संतोष पाटील यांच्या कुटुंबांनी त्यांच्या सेपापुर्तीचा आनंदाने स्वीकार करत आनंद व्यक्त केला. सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्व उपस्थितांना भोजनाची सोय करणारे जि.प.शाळा तऱ्हाडी चे मुख्याध्यापक जयवंत सोनवणे व जि.प.शाळा ठेंगचे चे मुख्याध्यापक गुलाब राठोड व सहशिक्षक शांतीलाल अहिरे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक तानाजी नवगिरे,अंबादास कऱ्हाळे आणि अनिल चिकटे यांनी मेहनत घेतली. ईश्वर कोळी यांनी फलकलेखन करून सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जोशी यांनी केले तर मनीषा गावडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .