बा ज्योतिबा. !
बा ज्योतिबा........
पेशवाईत इतिहास जमा झालेला छत्रपती इंग्रजी साहित्यातून काढून जयंती साजरी केली जरूर पण आज छत्रपती जयंतीला तुझा पत्ताच कट केला इथल्या व्यवस्थेने आणि माळी समाजात संकुचित करून टाकले बघ.. !
बा ज्योतिबा.........
सावित्री माईला साक्षर करून क्रांती घडवलीस, पण आज सावित्रीच्या लेकीच्या अनेक माता व्यवस्थेने उरी बसवल्या आहेत आणि शिकून सवरून त्या लेकींनी गुलामगीरीचा परतीप्रवास कधिचाच सुरू केला आहे .. !
बा ज्योतिबा........
प्रवाह विरोधी जाऊन ज्यांच्यासाठी संघर्ष केलेस ना, त्यांचा कर्मकांडात गाठलेला कळस पाहिला असता तर जाळून टाकणार होतास आज तुझे समग्र साहित्य आणि त्यातच आत्मदहन केला असतास.!
बा जोतिबा......
तुला भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करतांना सुद्धा आम्हाला लाज वाटते. कारण, इथला सत्ताधीश सत्ता उपभोगासाठी रांड बनलेली आहे. अश्या रांडे कडून पुरस्कार घेऊन कुठे तुला सन्मान मिळणार आहे? तू सदैव माझ्या ह्रदयात भारतरत्नच आहेस..!
बा ज्योतिबा......
पण, तुझे कार्य निरर्थक कसे ठरतील? त्याची दखल घेतली तुझ्या नंतरच्या महामानव महापुरुषयांनी. बाबासाहेबांनी तर गुरुच मानलेले तुला. बघ तुझा विचारशिष्य भारतरत्न काय विश्वरत्न झाला आहे. तुझ्या आणि तुझ्या गुरूच्या विचारांना संविधानात समाविष्ठ करून अमरत्व दिले आहे बघ..!
- अमोल नायक
(भीमणीपुत्र कटमाळो)
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .