महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन तर्फे विविध मांगण्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षा ताई गायकवाड यांना निवेदन सादर!

शालेयवृत्त सेवा
0

 



हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे पुष्गुच्छ न देता पुस्तक शाल देऊन सत्कार!


औरंगाबाद-  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा ताई गायकवाड यांची भेट घेतली. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी-शिक्षकांचे  विविध मागण्याबद्दल सविस्तर चर्चा करून एक नाही दोन नाही तब्बल 4 निवेदन सादर केले. 

१) महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

२) २०%  व  ४०% अनुदानित शाळांना प्रचलीत नियमानुसार १००% टक्के अनुदान देण्यात यावे.

३) त्रुटी पात्र शाळांना अनुदान घोषित करण्यात यावे. 

४) औरंगाबाद (मुकुंदवाडी) येथील स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलन करीत असलेले शिक्षक गजानन खैरे सर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे म्हणून अन्नत्याग उपोषणाची तात्काळ दखल घेऊन त्यांचे उपोषण लवकरात लवकर सोडावे.

५) सर्व व्यवस्थापन च्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता तसेच शाळेच्या पहिल्या दिवसापासून गणवेश देण्यात यावे. 

 ६) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना त्वरित लागू करावी.

७) महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.

८) रमजान ईद निमित्त माहे एप्रिल ची वेतन ईद पूर्वी म्हणजे 25 एप्रिल पर्यंत अदा करण्यात यावी.

      शेख अब्दुल रहीम सरांनी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ताईसाहेबांना विनंती केली की आपण स्वतः लक्ष देऊन सर्व मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी विनंती केली. यावेळी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी साहेब, शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब, माजी आमदार कल्याण काळे साहेब आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)