मुख्याध्यापक हंसराज पाटील यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न !

शालेयवृत्त सेवा
0



नंदुरबार ( गोपाल गावित ) :

नंदूरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बामडोद येथील मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज विठ्ठल पाटील हे नुकतेच नियतवयोमानूसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा कृतज्ञता सोहळा हाँटेल हिरा एक्झिक्युटिव्ह नंदुरबार येथे संपन्न झाला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संसदरत्न नंदुरबार लोकसभा खासदार हिनाताई गावीत, प्रमुख अतिथी आमदार  मा.विजयकुमार गावीत, आमदार मा.भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी, मा.अध्यक्ष आबासाहेब वकील पाटील, जि. प.सदस्या सुप्रियाताई गावीत, जि.प.सदस्य शांताराम पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता कर्जत नानासाहेब काळदाते पाटील, पदोन्नती मुख्याध्यापक नानासाहेब मधुकर देवरे, प्रा.भास्करराव कदम तसेंच जिल्ह्यातील सर्व प्राथ./माध्य.संघटनांचे पदाधिकारी केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू भघिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा हस्ते सत्कार व सन्मान सत्कारमुर्ती हंसराज पाटील व सपत्नीक यांचा सन्मान  करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा नंदुरबारच्या वतीने बापूंना मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विविध राजकीय, संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी बापुंचा विविध भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. 


नंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतात हंसराज पाटील यांनी  अतिदुर्गम भागातील सेवेसह जीवनातील शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आलेखाबाबत माहिती सांगुन स्वतःच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत गौरवोद्गार काढलेत व उर्वरित आयुष्य सुख समृद्धी, निरोगी जावो अशा शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्तींना उत्तर देतांना बापुंनी जीवनातील अनेक अनुभव सांगितले व वेळोवेळी जेष्ठांचे मार्गदर्शन लाभत गेले म्हणून सर्वच मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच नंदुरबार जिल्हा प्राथमिक, माध्यमिक शैक्षणिक संघटना समन्वय समिती तसेच खोंडामळी/ बामडोद/ नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी तर आभार प्रदर्शन बामडोद शाळेचे शिक्षक आनंदराव करनकाळ यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)