गणेशपुरे जुने शाळेत 'शाळा पुर्वतयारी मेळावा' संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड  ( शालेय वृत्तसेवा ) :

जि .प .प्रा .शाळा गणेशपूर जुने .केंद्र. कमठाला तालुका. किनवट येथे आज दिनांक 31 मार्च 2022 रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रविण पिल्लेवार सर व सहशिक्षिका श्रीमती. उर्मिला परभणकर यांनी शाळापूर्व तयारीचे आयोजन केले.कार्यक्रमाला शा. व्य. समितीचे अध्यक्ष. श्री.विजय मेश्राम व गावातील ज्येष्ठ नागरिक तुकारामजी आत्राम गावातील शिक्षक मित्र चंद्रकांत कुमरे व विदेक्षा जुगनाके व स्वयंसेवक पुजा कर्हाळे, निशा व वैशाली, पहिलीस पात्र विद्यार्थ्यांचे सर्व पालक, अंगणवाडी सेविका कल्पना बावणे  ,शा.पो.आ.कर्मचारी पारूबाई आत्राम व प्रकाश आत्राम  व श्री संदिप गाडे उपस्थिती होते तसेच कमठाला  केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शरद कुरुंदकर  सर यांनी भेट दिली .



शाळा पूर्वतयारीमध्ये माझा विकास यामधील सातही टप्प्या प्रमाणे स्टॉल लावून विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानाची तपासणी करण्यात आली.  प्रवेश पात्र मुलांसाठी पुष्पगुच्छ,सुंदर टोप , फुगे ,चॉकलेट देऊन त्यांना आनंदित करण्यात आले. शैक्षणिक साहित्य पाहून विद्यार्थी खूप आनंदित झाले प्रत्येक स्टॉलवरील साहित्य अगदी आनंदाने हाताळत होते आणि उत्तरे देत होते .शाळेत येण्याची इच्छा व्यक्त करत होते. दवंडी देवून  जनजागृती ही करण्यात आली होती. घोषवाक्य देण्यात आले तीन महिने आधी शाळेशी आपल मुल जोडले जात  आहे यामुळे पालकही  आनंदित झाले कारण दोन वर्ष  आपलं मूल  अंगणवाडी पासून वंचित होते .आता त्याला शाळेत जाण्याची आवड निर्माण होईल व विद्यार्थी शाळेत जाईल अशी पालकांना खात्री वाटू लागली.


 सातही स्टॉलची माहिती शारीरिक विकास, बौद्धिक विकास, मानसिक विकास,भाषा विकास,गणित विकास, भावनिक विकास, माताना उदबोधन व साहित्य वाटप देऊन सर्व पालकांना विशेष करून मातांना मुख्याध्यापक श्री पिल्लेवार यांनी मार्गदर्शन केले व आपली आई / वडील म्हणून काय भूमिका असेल त्याबद्दल समजावून सांगितले त्यानंतर केंद्रप्रमुख यांनी सुद्धा माहिती दिली  तसेच प्रवेश पात्र  मुलांशी संवाद ही साधला. शेवटी शिक्षिका उर्मिला परभणकर यांनी  थोडक्यात माहीती देऊन  सर्वांचे आभार व्यक्त करून  बिस्कीट चॉकलेट  चहा अल्पोपाहारा घेऊन नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)