जिल्हा परिषदेच्या शाळेचे ध्वजारोहण कोणी करावे ?

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्हा परिषदेच्या शाळेचे ध्वजारोहण कोणी करावे ?


महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शि.सो. झनके यांनी दिनांक 12 .8 .2005 या दिवशी सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत या दिलेल्या पत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 



या पत्रामध्ये संदर्भ क्रमांक 1 शासनाचे पत्र दिनांक 15. 3. 2004 दिलेले आहे तसे संदर्भ क्रमांक 2 ला माहितीच्या अधिकार नियम 2002 च्या अर्जाचा उल्लेख केला आहे. या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगितले आहे की सदर संदर्भ क्रमांक एकच्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबतचे आदेश दिले आहेत. 



वरील संदर्भातील पत्र क्रमांक 1 अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या होत्या तथापि संदर्भातील पत्र क्रमांक 2 च्या संदर्भात पुनश्च कळविण्यात येते की केंद्र शासनाच्या गृहमंत्रालया मार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात. 


केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबईत माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुकास्तरावर तहसीलदार व प्रांताधिकारी व शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. कृपया या प्रमाणे कार्यवाही करावी असा स्पष्ट उल्लेख माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी आदेश दिलेले आहेत .



( टीप : यानंतरही काही परिपत्रक निघाल्यास कळवावे. )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)