बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळेत 'शाळा पूर्व तयारी अभियान' गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालकांना केले दाखल !

शालेयवृत्त सेवा
0



सांगली ( शालेच वृत्तसेवा ) :

जत तालुक्यातील पांडोझरी येथील  आय.एस.ओ. मानांकन प्राप्त बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळेत 'शाळा पूर्व तयारी अभियान' उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ( डायट) प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर  बालकांना दाखल केले.


   मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प, पुस्तके देऊन  स्वागत करण्यात आले. शिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. शाळेत राबवित असलेल्या उपक्रम माहीती करून घेतली. व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व संवर्धना बदल वाघमारे गुरूजी, पवार गुरुजी यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.


   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ( डायट) प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी म्हणाले,शिक्षक व समाजाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळातील दुर्गम भागातील शाळांनी बाबरवस्ती शाळेप्रमाणे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये  राबवली जाऊ शकतात व दर्जेदार शिक्षण दिले जाऊ शकते.यासाठी शिक्षकांनी स्वक्षमता विकासाबरोबरच व्यवस्थापन समितीच्या समन्वयाने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी स्वयंस्फूर्तीने काम करणे गरजेचे आहे.


    शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील शिक्षकाने शाळा पूर्व तयारी अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती गावातील स्थानिक मंडळी पदाधिकारी सर्वांच्या सहकार्याने पुढील वर्षी वयोगट तीन पासून अंगणवाडी व इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे पूर्व नियोजन करावे.निश्चितच जून पासून सुरू होणाऱ्या आपली शाळा पूर्व तयारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरू होईल.नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे करता येईल.



    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते. शिक्षकाने ती गुणवत्ता शोधून शिक्षकांनी आवश्यक ते वातावरण आणि मार्गदर्शन केले तर निश्चितच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा प्रशासकीय अधिकारी,  शास्त्रज्ञ व अन्य क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवू शकतात. दुर्गम भागातील अनेक मुले  खाजगी  कंपन्यांमध्ये काम करत आहेत.दुर्गम भागामध्ये वृक्षारोपण करून ते संवर्धन करण्याचे काम करत असलेबाबत समाधान व्यक्त केले. सर्वांग सुंदर व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक संस्कार विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत दिले जात आहेत. खाजगी शाळेतून जिथे भरमसाठ पैसे देऊनही विद्यार्थी व्यक्तीमत्व घडताना पाहू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतून बाबरवस्ती सारखे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे सर्वांग सुंदर व्यक्तीमत्व बनविण्यासाठी सुकर ठरतात. त्याबद्दल शिक्षक,पालक व ग्रामस्थ व भावी नागरिक विद्यार्थी या सर्वांचे  आभार मानावे तेवढे कमीच आहे.


 यावेळी  लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या वाचन बांधकाम कट्टा व युथ फॉर जत यांनी दिलेल्या संगणकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक ग्रामस्थ यांचा सत्कार डाएट येथील अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.  माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून मदत केली आहे. त्यामुळे डाएट तर्फे ग्रामस्थांचे व माजी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी यांनी अभिनंदन केले.


  आण्णाराया सिध्दगोंडा पाटील यांनी ५ विद्यार्थी दत्तक घेतले. त्या विद्यार्थ्यांना साहित्य किटचे वाटप प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी,शिक्षक  शिक्षण विभाग प्रमुख श्री अरूण पाटील ,विज्ञान व नवोपक्रम विभाग प्रमुख डॉ राजेंद्र भोई, कला कार्यानुभव व संगीत विभाग प्रमुख तुकाराम कुंभार, केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 


   यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ.राजेंद्र भोई  वरिष्ठ अधिव्याख्याता, तुकाराम कुंभार अधिव्याख्याता ,केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड, राजकुमार करडी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती कोरे, गीता बाबर,शोभा बाबर, सुरेश मोटे,आप्पासो गडदे, तुकाराम बाबर,प्रकाश बाबर, खांडेकर काकू, पुंडलिक कोरे,शाळेतील शिक्षक अनिल पवार,उपस्थित होते.


   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)