नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आनंददाई मेळाव्याने

शालेयवृत्त सेवा
0

 


सांगली ( असमा नदाफ ) :

सरोवर शिक्षण मंडळातील सर्व शाळांच्या वतीने नवीन वर्षाची शाळा सुरु होण्या पूर्वी आनंददाई मेळावा गट शिक्षणाधिकारी मा.श्री.गणेश भांबुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया हौसाने मेळावा पार पडला.शासनाचे कृतीयुक्त चित्रे,गाणी प्रत्येक विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आले.नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांना व पालकांना प्रेरणा देणारा उपक्रम अल अमीन मराठी,इंग्लिश प्रायमरी व सरामद जयनब उर्दू शाळा मधील सर्व शिक्षक, मुले, व पालक यांच्या मोठया संख्येने पार पडला. सकाळी 7 वाजता प्रभातफेरी शाळा परिसरात वाजत गाजत हौसाने काढली.शासन इच्छेनुसार श्री.गणेश भांबुरे ( ग.शी ) यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मैदानावर वेगवेगळ्या विषयाचे स्टॉल तयार होते.एक छोटासा मनपसंद बाजार भरल्यासारखे दिसत होते. 


श्री.गणेश भांबुरे यांनी सर्व स्टॉल ची पाहणी करून पालकांना समजाऊन सांगत होते.त्याच बरोबर बालवाडी चे शिक्षक बरोबर संस्थापक हाजी.मुनिरुद्दिन मुल्ला व अध्यक्ष श्री.फारूक भाई अकीवाटे चिटणीस श्री.शब्बीर सो इत्यादी व प्रतिष्टीत नागरिक हारून शेख सो व इतर सर्व उपस्थित झाल्याने मेळावा उत्तम असा दिसत होता कार्यक्रमाचे नियोजन निलेश माळी ,अफरोजा नदाफ ,शबाना  नदाफ  ,आसमा नदाफ.रूपरेषा अश्विनी पाटील,अतिक व शाहीन आणि सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.उर्दू शिक्षक अबूबकर भालदार यांनी आभार व्यक्त केले.पालक इतर शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहात भाग घेतला          


   .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)