मानवत येथे अक्षर मानवचे दुसर्‍या शिक्षण संमेलनाचे आयोजन..

शालेयवृत्त सेवा
0

 



परभणी ( शालेय वृत्तसेवा ) :

देशात शिक्षण सुंदर, ज्ञानदायी, आनंददायी केलं पाहिजे. नव्या, आदर्श, चांगल्या कल्पना अंमलात आल्या पाहिजेत, शिक्षणाच्या अडचणी लक्षात आल्या पाहिजेत आणि त्यावर उपाय काढता आले पाहिजेत, म्हणून अक्षर मानव शिक्षण संमेलन.

अनेक मान्यवर, प्रयोगशील लोकांचा सहभाग असणार आहे. सर्वांना मुक्त प्रवेश. राहणं-जेवणं विनाशुल्क. स्त्रियांची स्वतंत्र व्यवस्था असेल.


अक्षर मानव शिक्षण संमेलनात संमेलन अध्यक्ष मा.राम घटे, संमेलनाचे उदघाटक मा.विठ्ठल भुसारे , शिक्षणाधिकारी (प्राथमिक),जिल्हा परिषद परभणी हे आहेत.स्वागताध्यक्ष म्हणून  युवराज माने,अक्षर मानव शिक्षण विभाग हे असणार आहेत .


प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांची असेल.तसेच मा.बबन शिंदे साहित्यिक ,मा.पृथ्वीराज तौर,मा.शंतनु कैलासे,श्रीमती लीला शिंदे,सुप्रसिद्ध कवियत्री,  मा.नंदन नांगरे ,माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र,मा.इंद्रजित भालेराव, सुप्रसिद्ध कवी,मा.शिवाजी अंबुलगेकर सुप्रसिद्ध साहित्यिक,हे प्रमुख वक्ते असणार आहे.अक्षर मानव शिक्षण संमेलन पहिले मावळते अध्यक्ष मा.गोपाळ नाईक,संयोजक माधव उलीगडे व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी  डीआर रणमाळे,प्रयोगशील शिक्षक जगदीश कुडे, डिगांबर भिसे, कल्पना हेलसकर,तुपसागर किशोर,दत्ता पवार,पेंटू मैसनवाड ,विनोद शेंडगे,विलास मिटकरी हे विशेष सहभाग घेत आहेत. संमेलनात विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे.मातोश्री स्नेहप्रभा तौर कृतज्ञता बालसाहित्य पुरस्कार देऊन बालसाहित्यिकांचा गौरव करण्यात येत आहे.


संमेलन स्थळ मानवत (जिल्हा परभणी) येथील आई इंग्लिश स्कूल हे आहे.संमेलन दिनांक 14,15 व 16 एप्रिल 2022 रोजी आयोजित केले आहे.तरी परिसरातील आणि राज्यभरातील शिक्षण प्रेमी लहान थोर सर्व वयोगटातील लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक शिरीष लोहट केंद्र प्रमुख मानवत 

मानवत - पाथरी तालुका शिक्षक मित्र परिवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी युवराज माने 75174 78570 यांच्याशी संपर्क साधावा.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)