यंदा दोन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी.. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून !

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई (शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील शाळांना यंदा दोन मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीचा कालावधी 12 जून पर्यंत असेल. 2022 - 23 या पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात यावेळी जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 13 जून रोजी होणार आहे. याच दिवशी विदर्भाचा अपवाद वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण संचालनालयाने आदेश जारी केला आहे. 


जून महिन्यातील विदर्भाचे तापमान लक्षात घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा 27 जून रोजी सुरू होणार आहेत अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.


असा आहे आदेश -

◼️ 2 मे पासून 12 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी 

◼️ पुढील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 13 जून पासून विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू .

◼️कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय ही पूर्ण क्षमतेने सुरू केली .

◼️वर्षभरातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा अधिक नसाव्या याबाबत शाळांना सूचना .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)