नंदूरबार जिल्हा परिषदेच्या वतीने क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( गोपाल गावीत ) :

जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या यशस्वी कर्मचाऱ्यांचा पारितोषिक देवुन सन्मान करण्यात आला. या महोत्सवात तालुका व जिल्हास्तरावरील ४० कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले . तर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः एक मार्मिक विनोद सादर करुन उत्साह वाढविला. 


नंदुरबार जि.प. अध्यक्षा अॅड . सिमा वळवी , उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २२ वर्षानंतर जिल्हा परिषदेमार्फत दोन दिवसीय जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा अॅड. सिमा वळवी यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी व आरोग्य सभापती अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पाटील , कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर,प्रा.शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण आदी उपस्थित होते. 


सांस्कृतिक कार्यक्रमात तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील ४० कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात एकपात्री नाटक , समूह गीत व नृत्य, कवितावाचन, गीत गायन आदी कार्यक्रम संपन्न झाले. क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सभापती अभिजित नाईक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील , कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर,प्रा.शिक्षणाधिकारी  डॉ.युनुस पठाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


क्रीडा स्पर्धेत १०० मीटर व ४०० मीटर धावणे प्रकारात प्रथम - बबीता पाडवी , द्वितीय- मंगला वळवी , तृतीय- धनश्री जाधव . गोळा फेक - प्रथम डॉ. वर्षा फडोळ, द्वितीय - कविता शिंदे, तृतीय धनश्री जाधव. लांब उडी- प्रथम संगीता नरवाडे , द्वितीय - बबीता पाडवी , तृतीय - संगीता जाधव, बुध्दिबळ स्पर्धेत मनीषा अहिरराव , द्वितीय - कविता शिंदे, तृतीय संगीता जाधव, बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम- संगीता जाधव, द्वितीय मोनिका सोनार तर क्रिकेट स्पर्धेत डॉ. वर्षा फडोळ यांच्या नेतृत्वाखाली विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. 


तसेच वैयक्तिक पुरुष गटात १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम- राकेश कोकणी, द्वितीय विवेकानंद चव्हाण, तृतीय - शरद गावीत. ४०० मीटर धावणे प्रथम- राकेश कोकणी , द्वितीय- परमेश्वर कल्याण, तृतीय - विवेक चव्हाण.८०० मीटर धावणे प्रकारात प्रथम भारत ठाकरे , द्वितीय- महेंद्र बैसाणे, तृतीय - भोळाराम वळवी, गोळाफेक प्रथम- राकेश कोकणी, द्वितीय - रुपेशकुमार नागलगावे , तृतीय लिलेश्वर खैरनार.लांबउडी प्रकारात प्रथम- किसान पावरा , द्वितीय - शरद गावीत तृतीय - राकेश कोंकणी बॅडमिंटन प्रथम डॉ. योगेश्वर पाटील , द्वितीय प्रशांत वाघ , तृतीय- निलेश सोनवणे, खो - खो स्पर्धेत प्रथम - धडगाव पंचायत समिती, द्वितीय- शहादा पंचायत समिती तर तृतीय- नवापूर पंचायत समिती कबड्डी खेळात प्रथम - तळोदा पंचायत समिती, द्वितीय धडगाव पंचायत समिती, तृतीय - नवापूर पंचायत समिती तर क्रिकेटमध्ये विजेता- शहादा पंचायत समिती संघ, उपविजेता- नवापूर पंचायत समिती संघांना प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 


सांस्कृतिक कार्यक्रमात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत वैजाली शाळेचे शिक्षक गोपाल गावीत व पंचायत समिती शहादा अनिस पिंजारी यांनी भूमिका साकारली होती.उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकून भरभरून प्रतिसाद दिला.आदिवासी गाण्यावर नृत्य सादरीकरण करण्यात आले होते. सांस्कृतीक महोत्सवाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.तर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, प्रशासन अधिकारी सुभाष मारणार, नितीन खंडेराय, गौतम शिरसाठ, तापसिंग पाडवी, राहुल भोये, सुनील पाटील, दिलीप जाधव आदींनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)