शाळा, शिक्षक व मागासवर्गीय कर्मचार्यांच्या प्रश्नांची विनाविलंब सोडवणूक करणार.. - नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर -घूगे मॅडम

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शाळा व शिक्षकांचे प्रश्नांची विनाविलंब सोडवणूक, नांदेड जिप अंतर्गत मागासवर्गीय कर्मचार्यांच्या प्रश्नांच्या सोडवूणूकीसाठी विशेष कक्ष व प्रशिक्षित कर्मचार्यांची नेमणूक करणार. असे स्पष्ट आश्वासन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे  मॅडम यांनी शिक्षक संघटनां पदाधिकारी यांच्या बैठकीत दिले आहे.

     

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे मॅडम यांनी नांदेड जिपच्या प्रशासक पदाचा पदभार घेतल्या आपल्या निजिकक्षात आज प्रमुख शिक्षक संघटना पदाधिकारी यांची एक व्यापक बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे, म.रा.बहुजन महासंघाचे राज्याध्यक्ष मा.दिनकरराव हनमंते, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ( इब्टा) चे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, म.रा.पदवीधर संघटनेचे मा.चंद्रकांत दामेकार, माजी शिक्षण समिती सदस्य मा.फारुख बेग, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.विठ्ठलराव बनबरे, अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.शिवाजीराव भगनुरे, अखिलचे जिल्हा सरचिटणीस मा.प्रल्हाद राठोड, बहुजन महासंघाचे मा.आनंद मांजरमकर आदींची तर शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सौ.सविता बिरगे मॅडम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा.प्रशांतजी दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी मा.बंडू अमदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


             यावेळी प्रशासक पदाचा पदभार स्विकारल्या बद्दल सर्व शिक्षक संघटना पदाधिकार्यांच्या वतीने मुकाअ मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे मॅडमचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, शिक्षण विभाग व शिक्षक संघटना यांच्याशी खालील बाबींवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय झाला व निर्णय घेण्यात आला.

 १) सार्वत्रिक बदल्यांपूर्वी विषय शिक्षक, पदोन्नत मुअ व तत्सम सर्व प्रकारच्या पदोन्नत्या करणार व ऐनवेळी पदोन्नती नाकारण्याची संधी देणार.


२) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना १० टक्के निधी शाळेच्या गरजानुसार खर्च करण्यास अनिवार्य करणार, शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करणार, शाळांचे विजबिल भरण्यासाठी ग्रां.प. मार्फत तरतुद करणार.

३) नांदेड जिप अंतर्गत सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी मागासवर्गीय अन्याय निवारणाचा एक विशेष कक्ष जाणकार कर्मचार्यांची नियुक्ती करून कार्यन्वीत करणार. महिन्याला एक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला एक व्यापक बैठक घेणार असे स्पष्ट आश्वासन दिले.

४) वाढती उष्णता लक्षात घेता. सकाळी 8:30 ते 9:00 हा रिपोर्टीग टाईम राहील. सकाळी 9:00 पर्यंत शाळेत येणाऱ्या शिक्षकांना मुभा देण्यात यावी सकाळी  9:00 ते 1:30  शाळा भरविल्या जातील. यात मुलांसाठी मध्यांतर देण्यात यावी. सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घुगे  मॅडमनी दिल्या.

५) २५ एप्रिल नंतर शिक्षक- प्रशासन सुसंवाद व काळानुरुप तज्ञ मार्गदर्शकाकडून तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनाचा मनोदय नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा.सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. 

 ६) मुकाअ याचे दालन सर्वांसाठी खूले आहे. आपणांस कमी वेळात अधिकचे प्रश्न सोडवायचे आहेत. पंस /जिपंचे कनिष्ठ अधिकारी तुमचे प्रश्न सोडवित नसतील वा अडवणूक करीत असतील तर आपण थेट माझ्याकडे वेळ घेवून भेटावे. आपल्या सर्व सनदशिर प्रश्नांना न्याय देण्याचे स्पष्ट आश्वासन मुकाअ मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे मॅडम यांनी दिले.

      बैठकीचे आभार प्रदर्शन अखिलचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे यांनी केले. बैठक आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)