विखरण जि.प.शाळेत महिला दिनानिमित्त बालआनंद मेळावा ..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार  (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळा विखरण येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी बापु विश्राम पाटील, प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील दिपमाला पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुपडू भिल, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, मनोहर लोहार, सन्मानिय सदस्य ,ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.


प्रथम  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेतील मुलींनी कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाला उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


शेवटी बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.विविध प्रकारचे दुकान मुलांनी लावले होते.बालकांनी व उपस्थिती पालकांनी मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. बालआनंद मेळाव्यात मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी खास करून बामडोद शाळेचे मुख्याध्यापक करणकाळ सर व कानळदे शाळेचे मुख्याध्यापक,शशिकांत पाटील सर उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधिर बोरसे यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक अनिल वाघ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)