वैजाली जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा. .

शालेयवृत्त सेवा
0

  



नंदुरबार ( गोपाल गावित ) 

शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ८ मार्च , १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. क्रांतीकारक महिला राष्ट्रमाता जिजाऊ, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळ वीर कल्पना चावला, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कविता सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक महिला विषयी माहिती शाळेतील शिक्षिका उषा पाटील यांनी सांगितली.


 समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात ' जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शिक्षक चंदु पाटील,भरत पावरा, भरत पावरा, राजु मोरे, गोपाल गावीत, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)