सेवापूर्ती निमित्त गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांना निरोप

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( गोपाल गावित ) :

शहादा तालुक्याच्या सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर मॅडम यांना परिवर्धा केंद्राकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. तसेच नूतन गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी यांचा गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व स्वागत करण्यात आला आणि शहादा नं १ बीट चा विस्तार अधिकारी शिक्षणचा प्रभार ममता पटेल यांना मिळाला असल्याने बीट मध्ये परिवर्धा केंद्राकडून त्यांचा स्वागत करण्यात आला.


 सेवापूर्ती व स्वागत सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ममता पटेल शिक्षण विस्तार अधिकारी तर प्रमुख उपस्थिती म्हणून पाडळदा पंचायत समिती गणाचे सदस्य सुदामभाई पाटील, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, नूतन गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी, परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पाटील, परिवर्धा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख मोहन बीस्नारिया, शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष अनिल सोनवणे, परिवर्धा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश पटेल, सोनवल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत महिरे सर, विक्रम मोहारे, प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट आदी उपस्थित होते.


 कार्यक्रमाच्या सुरवातीला सुंदर स्वरात जि.प. काथर्दे खु शाळेचे विद्यार्थिनींनी ईशीस्तवन व स्वागत गीत गायन करून कार्यक्रमाची सुंदर सुरवात केली. त्यानंतर पेंढारकर मॅडम यांच्या सेवाकाळातील कामाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. सेवापूर्ती सोहळ्याचे निरोपमुर्ती उषा पेंढारकर मॅडम विषयी च्या आठवणी व त्यांच्या प्रशासकीय काम व शाळा भेटीतील मार्गदर्शन बाबत मनोगत केंद्रातील शिक्षक नरेंद्र कुवर, मनीषा गावडे, स्नेहल गुगळे, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, कल्पना शिंदे, ज्ञानोबा सुरनर आणि विक्रम मोहारे या शिक्षकांनी व्यक्त केले व पेंढारकर मॅडम यांना सेवापूर्ती च्या शुभेच्छा दिल्या. तदनंतर व्यासपीठावरील मान्यवर डी.टी.वळवी, सुदामभाई पाटील, मोहन बिस्नारीया, संतोष पाटील , अनंत महिरे आणि ममता पटेल यांनी पेंढारकर मॅडम विषयी, त्यांच्या कामाविषयीच्या आठवणी काय शिकावं याबाबत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.


उषा पेंढारकर मॅडम यांनी त्यांच्या काळात शहादा गटातील शाळेतील भौतिक सुविधा, विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी खूप चांगले काम केले आहे. तसेच कोरोना काळात विविध कामे  कोविड-१९ कंट्रोल रूम, माझे कुटुंब माझी जबाबदारी, कुटुंब सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे जे काम दिली ते सर्व काम आपले सहकारी व गटातील शिक्षकांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पाडल्या. अशा या त्यांच्या अनेक कामांबाबत सर्वांनी मनोगतात व्यक्त केले व पेंढारकर मॅडम यांना सेवापुर्तीच्या आरोग्यमयी शुभेच्छा दिल्या. तदनंतर पेंढारकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानत मनोगत व्यक्त केला. 


सदरील सेवापूर्ती कार्यक्रमासाठी परिवर्धा शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, जयवंत जोशी, काळूराम टोपे, कोठली शाळेचे मनोज राठोड आणि के.डी.गावित खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मेहनत घेतली तर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जोशी यांनी केले तर स्नेहल गुगळे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)