सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 8 मार्च जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( राजेश पाटील ) :

किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 8 मार्च  जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य  डॉ आनंद भंडारे होते.सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेममनिवार , बीएड महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पाईकराव उपस्थित होते.


         प्रारंभी तहसीलदार डॉ मृणाल जाधव व प्राचार्या डॉ. अनुजा पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमा अंतर्गत  तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व  प्राचार्या डॉ. अनुजा पाटील यांचा संविधान प्रत , विविध पुस्तके,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


        तसेच डीएड ,बीएड व  महाविद्यालयीन विद्यार्थींनिंचा पुष्पदेऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभागाचे डॉ सुनील व्यवहारे  यांनी सूत्रसंचालन व प्रो डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी आभार मानले सरस्वती शिक्षण संकुलातील महाविद्यालय , बीएड  व डीएड चे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)