प्रकाशा केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार दि.२३(प्रतिनिधी) :

शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, प्रकाशा येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान देणाऱ्या थोर क्रांतीकारक शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन व शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या हस्ते करण्यात आले.


 केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी व प्रकाशा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व ५०% शिक्षक व ५०%शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.सदरील प्रशिक्षणास प्रकाशा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी भेट दिली व शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व, कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती सविस्तर सांगितले विविध उदाहरणे दिली. 


केंद्रशाळा मुख्याध्यापक रामलाल पारधी व त्यांनी यापूर्वी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील चिंचोरा गाव शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्य़ात नव्हे तर राज्यस्तरीय अधिकारी महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर साहेबांनी पहिल्या डिजिटल शाळेला सदिच्छा भेट दिली होती. त्या शाळेची यशोगाथा साहेबांनी सांगितली. राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण आदर्श शाळांमध्ये लोकसहभागातून शाळांचा विकास, शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट नियोजन शाळांचा कायापालट करण्याचा आलेल्या विविध वाडी, वस्ती, पाड्यावरील विकास झालेल्या शाळांची माहिती देण्यात आली.


दिनांक - २३ सदरील प्रशिक्षण २३ मार्च २०२२ ते २४ मार्च २०२२ अखेर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी केले. प्रशिक्षण सुलभक  मार्गदर्शक, केंद्रमुख्याध्यापक रामलाल पारधी व बुपकरी शाळेचे शिक्षक उमेश विसपुते यांनी दिले आहे.सदरिल प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत सर उपस्थित होते.यावेळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)