परिवर्धा केंद्रातील महिला शिक्षिकांचा सन्मान करून साजरा केला महिला दिन

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदूरबार  ( शालेय वृत्तसेवा ) :

शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्रातील महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच शालेय पोषण आहार मदतनीस यांचा सत्कार करून या सर्व महिला कर्मचारीवर्ग यांचा सन्मान करून केंद्रातील शिक्षकांनी  जागतिक महिला दिन साजरा केला. सदरील महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रातील जेष्ठ शिक्षिका निर्मला सामुद्रे या होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कलसाडी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच उषाताई भील, केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, कलसाडी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना पाटील, सोनवल शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा शिवदे आणि अंगणवाडी सेविका विद्या जोशी,जेष्ठ शिक्षक नरेंद्र कुवर,सुरेश कलंकार आणि श्रीकांत वसईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


 प्रथमतः सुरवातीला सर्व इतिसातील उत्तम कार्य केलेल्या महिला नेत्या, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्या यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर केंद्रातील सर्व महिला शिक्षिका निर्मला सामुद्रे,मीना पाटील,मनीषा शिवदे,कल्पना शिंदे, रक्षादेवी गांगुर्डे,ज्योती पाटील,मनीषा गावडे,स्नेहल गुगळे, स्वाती सोनवणे,वैशाली पाटील आणि मनीषा पाटील या सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका विद्या पाटील,मदतनीस मंजुबाई कोळी,विमलबाई मराठे, आशा वर्कर दुर्गा कोळी आणि शा.पो.आ. मदतनीस सोनीबाई कुवर या सर्व महिलांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तदनंतर केंद्रातील शिक्षक व शिक्षिका यांनी जागतिक महिला दिन इतिहास व माहिती बाबत आपले मनोगत व्यक्त केले.


 “आजच्या महिला या सक्षम होत आहेत. फक्त त्यांना प्रकट होणे गरजेचे आहे. महिलांच्या कामाचे गौरव होणे आणि त्यांना सर्व कामात सर्व वर्गाकडून साथ मिळणे गरजेचे आहे.त्यासोबतच महिलांचा सम्मान होणे याची आवश्यकता आहे.” अशी प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात महिला वर आधारित कवितांचे सादरीकरण व महिला सक्षमीकरण वर आधारित गाणे गायन शिक्षाकाकडून करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्ती धनके यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार काळूराम टोपे यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)