चंद्रकांत कदम यांना अक्षरोदय साहित्यगौरव पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सुप्रसिद्ध कवी, गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांच्या समतेच्या डोहाकाठी या मराठी गझलसंग्रहास अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र तर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीस दिला जाणारा 'अक्षरोदय साहित्यगौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


जि.प.हायस्कुल जवळगाव ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे विषय शिक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांच्या *समतेच्या डोहाकाठी* या पहिल्यावहिल्या मराठी गझलसंग्रहाचे प्रकाशन  गझलनवाज पं.भीमरावजी पांचाळेंच्या हस्ते झाले आहे.या आशयघन गझलसंग्रहास संपूर्ण महाराष्ट्रातून रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.


सदरील पुरस्कार वितरण दि.२७ मार्च २०२२ रोजी पिपल्स कॉलेज,नांदेड येथे सकाळी ११ वाजता ज्येष्ठ साहित्यिक सौ.मंगलाताई फुलारी,ज्येष्ठ ग्रामीण कथाकार दिगंबर कदम,ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे,मंडळाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मारोती मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)