शैक्षणिक साहित्य वाटप करून पुण्यतिथी साजरी करणे एक कौतुकास्पद उपक्रम - गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे

शालेयवृत्त सेवा
0

 


उत्तम गायकवाड या उपक्रमशील शिक्षकाने मातोश्रीच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दिवसेंदिवस समाजामध्ये मोठमोठे कार्यक्रम करण्याची एक स्पर्धा चालू झालेली आहे. पण पुण्यतिथी निमित्त व वाढदिवसानिमित्त जेवणा वरील खर्च कमी करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही काळाची गरज झालेली आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे यांनी  कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली येथील मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांनी त्यांची आई स्वर्गीय मातोश्री अनुसयाबाई गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी बॉटल,  वही व पेन वाटप करण्यात आले.




या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी अशोक पावळे, केंद्रप्रमुख चिखलवाड, केंद्रीय मुख्याध्यापक राजेश्वर  डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक धुळगंडे, नरंगल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिवराव शिंदे, गोदमगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खोबाची डोंगरे,  राणाप्रताप चंदावाड, एमटी मोरे, तंत्रस्नेही शिक्षक सुनील डोईबळे, माधव वटपलवाड, अंबुलगे सर, अमृतवाड, तर्फे वाड, दत्ता पाटील,  मेक लोड,  माधव गायकवाड, शिवराज मोरे, विठ्ठल अंगरोड सर, विनायक पवार सर, गोपतवाड सर, सूत्रसंचलन भारत घोरपडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ स्वाती अडबलबार मॅडम यांनी परिश्रम घेतले. आभार उत्तम गायकवाड यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)