मार्च ,एप्रिल ,मे या उन्हाळयाच्या महिण्यात पुर्णवेळ शाळेचा शासन आदेश मागे घेवून सकाळ सत्रात शाळा भरविण्याची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र पुणे यांना मार्च ,एप्रिल व मे या उन्हाळयाच्या महिण्यात पुर्णवेळ शाळेचा शासन आदेश मागे घेवून सकाळ सत्रात शाळा भरविण्याची मागणी ई-मेल द्वारा नुकतीच करण्यात आली. 


शालेय शिक्षण व किडा विभाग शासन आदेश दिनांक २४ मार्च २०२२ नुसार कोविड काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यापुढील शाळा पुर्णवेळ भरविण्याबाबत शासननिर्णयानुसार सांगण्यात आले आहे. मात्र या महिण्यांमध्ये सर्वत्र कडक उन्हाळा असतो, उष्माघातामुळे अनेकजण आजारी पडतात, अनेकांचे बळी पण जातात, ग्रामिण भागात बहुतांश ठिकाणी शाळेला वीज पुरवठा नाही जिथे आहे तिथे पूर्णवेळ वीज नसते, पंखे नसतात, मग विदयार्थ्यांना उन्हाच्या दिवसात दिवसभर पुर्णवेळ वर्गखोलीत बांधून कसे ठेवता येईल हा प्रकार म्हणजे शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होऊ शकतो त्यामुळे अशा उकाडयामध्ये विदयार्थी आनंददायी अध्ययन नक्कीच करू शकणार नाही. 


यापेक्षा सकाळ सत्रातच जादा तासीका घेवून सुद्धा नुकसान भरून काढता येवू शकते. करीता उपरोक्त संदर्भिय शासन आदेश मागे घेवून मार्च ,एप्रिल महिण्यातील शाळा सकाळ सत्रात घेण्यासाठी शिक्षक व विदयार्थ्यांच्या वतीने मागणीचे निवेदन राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीचे ई-मेल करण्यात आले अशी माहिती राज्य उपाध्यक्ष जी .एस .मंगनाळे, जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे, सरचिटणीस बाबुराव माडगे, माहुर तालुकाध्यक्ष एस एस पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)