इ.५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा ३० एप्रिल २०२२पूर्वी घ्या - महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव शालेय शिक्षण, शिक्षण आयुक्त पुणे , शिक्षण संचालक (प्रा.)पुणे  यांना नुकतेच निवेदन ई-मेल करण्यात आले.इ.५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा ३० एप्रिल २०२२ पूर्वी घेण्याची मागणी करण्यात आली.मागील शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या शै.वर्षात कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत न होता विलंब झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले होते.


सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी म्हणजे सन २०२१-२२या शै.वर्षातील इयत्ता ५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत होईल अशी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची मानसिकता झाली होती. पण मार्च २०२२ संपत आला तरी अद्याप शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन काहीच झाल्याचे दिसत नाही. ही बाब खेदजनक आहे. परीक्षा नियोजन जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमद्ये संभ्रम वाढत चालला आहे.


विद्यार्थ्याच्या बाल मानसिकतेचा विचार करता शिष्यवृत्ती परीक्षा किमान ३०एप्रिल २०२२पूर्वी होणे आवश्यक आहे. पुढील शैक्षणिक वर्षात परीक्षा घेणे उचीत होणार नाही. कारण सर्वच विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक तर बदलणारच आणि अनेक विद्यार्थ्याची शाळाही बदलणार आहे. 


त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची केलेली तयारी खंडीत होऊन परीक्षेवेळी विपरित परिणाम सर्व परीक्षार्थी विद्याथ्यावर होणार आहे.त्यामुळे विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून चालू शैक्षणिक वर्षातील इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ही कोणत्याही परिस्थित दि. ३० एप्रिल २०२२पूर्वी होणेसाठी योग्य आहे  उचित कार्यवाही करुन  ३० एप्रिल पूर्वीची परीक्षा तारीख लवकरात लवकर जाहीर  या मागणीचे निवेदन ई-मेल राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या स्वाक्षरी चे पाठविल्याची माहिती राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे,राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे , जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे , माहुर तालुकाध्यक्ष एस एस पाटील यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)