उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळेच्या वेळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने शाळेच्या वेळा उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळच्या एकाच सत्रात 8.30 ते 12.30 वेळात भरण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली. 


निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती,  शिक्षणाधिकारी (मा.) यांना देऊन सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना देऊन  शाळेच्या वेळा त्याची तीव्रता लक्षात घेता व शाळेवर भौतिक सुविधेत पंखा, विद्युत पुरवठा नसल्यामुळे माहूर ,किनवट तालुका डोंगराळ व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विचार करण्याची  संघटनेची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याशी व पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले .


यावेळी राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा मुख्य संघटक जे डी. कदम उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)