पंचायत समिती भोकरच्या गटशिक्षणाधिकारी पदी मा.माधव वाघमारे यांची निवड!

शालेयवृत्त सेवा
1

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

पंचायत समिती भोकर चे डॉ.डी. एस. मठपती साहेब  यांची पदोन्नती सहाय्यक संचालक म्हणून लातूर येथे झाली असल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी शैक्षणिक व प्रशासकीय  कार्यभार चालवण्यासाठी प्रशासनाचा मोठा अनुभव असणारे शिक्षण विस्ताराधिकारी माधव वाघमारे साहेब यांची नुकतीच गटशिक्षणाधिकारी पदाचे आदेश  देण्यात आल्याची माहिती मिळाली.


त्यांना प्रशासकीय कामकाज चालवण्याचा 2014 पासून शिक्षण क्षेत्राचा मोठा अनुभव असलेले आदरणीय माधवराव वाघमारे साहेब यांना तालुक्यातील शैक्षणिक धुरा सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर मॕडम ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ, वर्षाताई ठाकूर /घुगे मॕडम,सभापती मा.बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब , शिक्षण सभापती संजय बेळगे साहेब ,शिक्षणाधिकारी सौ .सविता बिरगे मॕडम ,पंचायत समिती भोकर च्या सभापती सौ निता व्यंकटेश राऊलोड मॕडम ,.गटविकास अधिकारी मा.राठोड साहेब यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या व प्रशासन चालविण्याचा अधिकार दिले.

 


मा.वाघमारे साहेब यांनी भोकर तालुक्यातील, शिक्षक ,विद्यार्थी समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतातुन सांगितले .त्यांचा तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी यांनी नुकताच सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.  



यावेळी शाहू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव सर,पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,शेख महमद नवाज सर शेख इलियास कनिष्ठ सहाय्यक प.स.भोकर ,देवठाणा केंदाचे केंद्रप्रमुख लक्ष्मणराव सुरकार सर,केंद्रिय मुख्याध्यापक विश्वाबर संकमवाड सर,पुरोगामी शिक्षक संघटनेचे भोकर तालुका कोषाध्यक्ष राज नामपल्ले सर,कांडली चे मुख्याध्यापक गामोड सर,थेरबन चे मुख्याध्यापक वट्टमवार सर, आमदार संत मळा गावडे सर मुख्याध्यापकांनी वट्टमवार सर पाकी तांडा चे मुख्याध्यापक हणमंतराव काऊलवार सर,कासारतांडा चे गजानन तेलंग ,बाबानगर चे मुख्याध्यापक  किरण कुमार पाटील सर,शिक्षक अंबेकर सरा,पुंडलिकराव बिरगाळे सर,मारोती बंडे सर,गौतम पोहरे सर,सौ.जयश्री बोरलेपवार मॕडम ,सौ.सुमन गबाळे मॕडम ,सौ.आशा कांबळे मॕडम ,सौ.अल्पना हत्ते मॕडम आदींच्या उपस्थितीत घेण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबुराव माडगे यांनी मांडले तर सुत्रसंचलन हणमंतराव काऊलवार यांनी केले तर आभार गजानन तेलंग यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम पोहरे ,राज नामपल्ले ,सुमन गबाळे अल्पना हत्ते यांनी मेहनत घेऊन यशस्वी केले.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

  1. अप्रतिम लेख.. शालेय वृत्तसेवा महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात शैक्षणिक बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहे.पुढील कार्यास शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा