प्रकाशा कन्या शाळेत शाळापूर्व तयारी अभियान कार्यशाळा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नंदुरबार  ( शालेय वृत्तसेवा ) : 

शहादा तालुक्यातील जि.प. प्रा . कन्याशाळा प्रकाशा येथे शाळापूर्व तयारी अभियान उत्साहात संपन्न झाले. केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.


 केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी शाळा पूर्वतयारी विषयी मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाचे सुलभक कन्या शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाटील, वैजाली शाळेचे शिक्षक राजू मोरे यांनी उपस्थित प्रशिक्षार्थी यांना शाळापूर्व तयारी इ .१ ली ला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी यांच्या सुचनेनुसार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. 


प्रशिक्षणार्थी यांना जेवण , स्टेशनरी देण्यात आली शाळास्तर मेळावा नियोजनात गटकार्य,विविध शैक्षणिक स्टॉल लावण्यात आले होते. प्रथम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संजय ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना महामारीने विद्यार्थी यांचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्षात शाळा स्वरुप माहिती दिली. 


कोविड-१९ या महामारीचा सर्वच घटकांवर लहान मुलांवर परिणाम झाला आहे. या जागतिक पातळीवर परिणाम शिक्षणावरही दिसून आला आहे. पहिलीत दाखल होतील त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभियानाचे नुकसान भरुन काढले जाईल त्याविषयी पूर्वतयारी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दर्पण भामरे यांनी केले व उपस्थितांचे आभार डामरखेडा शाळेचे मुख्याध्यापक विश्वास माळी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)