प्रहार शिक्षक संघटनेमार्फत नुतन गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांचा सत्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार दि.११(प्रतिनिधी)  :

शहादा तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी नुतन गटशिक्षणाधिकारी पदी डी.टी.वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांचा पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तालुक्यातील प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करण्यात आली .


बदल्या पारदर्शक करणेबाबत,शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदे भरण्यात यावीत, शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यात यावे. तालुका स्तरावर आलेल्या पगार अनुदान रक्कम प्राप्त होताच पुढील प्रोसेस करून लवकर बॅंकेत रक्कम जमा करावी. प्रलंबित प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके केंद्रनिहाय शिबिर  आयोजित करुन पडताळणी होऊन मिळावीत,शालेय पोषण आहार स्वंयपाकीण व मदतनीस मानधन मिळावे,सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे पेन्शन मंजूरीचे आदेश सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळावेत, मयत शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा नोकरी देण्यात यावे,याकरिता  जिल्हा स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात यावे. 


शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेत जिल्हास्तरावर प्रस्तावित करावीत, मंजूर झालेली बिले संबंधितांच्या खाती जमा करावीत शिक्षकांचे चटोपाध्याय वरिष्ठ व निवडश्रेणी मंजुर करण्यासाठी जिल्हा स्तरावर पाठपुरावा करावा. शिक्षकांना ऑनलाइन उपक्रम आणि माहिती भरण्याची कामे कमी करून ऑफलाईन अध्यापनासाठी मोकळीकता द्यावी या व इतर मागण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांच्याकडे मागणी व चर्चा करण्यात आली. 


यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन प्रहार शिक्षक संघटनेस दिले. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक -तानाजी नावगिरे, संघटक -शक्ति धनके,संघटक -सावनकुमार ठाकरे ,कोषाध्यक्ष-ज्ञानोबा सुरनर तसेच गजानन सोनुने,संजय जाधव,कृष्णा तांबे,अंबादास कर्हाळे,जोतीराम डोणे, भक्त चाटे, बालाजी मुकनर ,बालाजी वाडीकर, संतोष जगताप, भुजंग भोसले, अदिनाथ घुले , भरत पावरा तसेच सर्व तालुका पदाधिकारी व शिक्षक बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)