शहादा तालुक्यातील प्रा.शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

शालेयवृत्त सेवा
0

 



 नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शहादा तालुक्यातील शिक्षकांच्या अनेक वर्षापासून असलेल्या विविध मागण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला  प्रहार शिक्षक संघटनेला यश मिळाले  आहे. यामध्ये अनेक वर्षापासून शिक्षकांनी उच्च शिक्षण परवानगी साठी अर्ज केले होते पण संबधित शिक्षकांना उच्च परवानगी चा आदेश मिळत नव्हता. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित व तालुकाध्यक्ष तुकाराम अलट व त्यांच्या  शिष्टमंडळाने वेळोवेळी निवेदन देवून पाठपुरावा करत  जवळपास ९३ शिक्षकांचे उच्च शिक्षण परवानगी बाबतचा  आदेश दि. ४ मार्च रोजी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे पंचायत समिती शहादा यांनी काढले आणि प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाला यश मिळाले. 


याचबरोबर इतर मागण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने दि. २०/१२/२०२१ रोजी मा. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी शहादा यांना निवेदन दिले होते. या निवेदनात उच्चशिक्षणासाठी परवानगी, प्रलंबित मेडिकल बिले निकाली काढणे, अद्याप अदा न झालेल्या शिक्षकांचे स्थायित्व प्रमाणपत्र मिळणेबाबत, सेवापुस्तक नोंदी करणेबाबत केंद्रस्तरावर शिबीर आयोजित करणेबाबत, ७ वा वेतन आयोगाचा २ रा हफ्ता मिळणेबाबत आणि प्रलंबित सी.एस.आर.एफ. फॉर्म जिल्हास्तरावर प्रस्तावित करणेबाबत इत्यादी मागण्याचे निवेदन प्रहार शिक्षक संघटना तालुका कार्यकारिणीने देवून त्याबाबत वेळोवेळी पाठपुरवा घेतला होता. यातील उच्चशिक्षण परवानगी चा आदेश दि. ४ मार्च रोजी निघाला, शिक्षकांच्या मेडिकल बिल व स्थायित्व प्रमापात्र बाबत जिल्हा स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला.


सेवापुस्त नोंदी बाबतचा गटशिक्षणाधिकारी यांनी दि. २४/०२/२०२२ रोजी काढला. ७ व्या वेतन आयोगाच्या हफ्त्याची मागणी जिल्हास्तरावर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कडून मिळाली. आणि सर्व सी.एस.आर.एफ फॉर्म जिल्हास्तरावर पाठवण्यात आले आणि प्रहारच्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नाला यश मिळाले. सदरील निवेदनातील सर्व मागण्या पूर्ण केलेबाबत सर्व शिक्षकांनी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांचे आभार मानले. आणि प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावा बाबत तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी  प्रहार संघटनेचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)