साहित्यिक शिक्षक प्रज्ञाधर ढवळे यांच्या 'सोनकिडा' या कथेला पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील संवाद प्रागतिक विचार मंचाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून येथील साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांच्या 'सोनकिडा' या कथेला पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संयोजन समितीच्या वतीने डॉ. विलास ढवळे यांनी कळविले आहे. 


   डिसेंबर २०२१ मध्ये राज्यस्तरीय खुली कथा स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील कथालेखकांसह विदेशातील मराठीभाषक लेखकांनी यासाठी कथा पाठविल्या होत्या. प्राप्त कथांपैकी ७६ कथा प्रथम परीक्षणातून निवडण्यात आल्या होत्या. यातून येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांच्या 'सोनकिडा' या कथेला वाघजी रामजी वाघमारे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.  


            रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरवपत्र हे पुरस्काराचे स्वरूप असून पुढील महिन्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे. यापूर्वी ढवळे यांच्या 'जोडवं', 'इसकालरपीस', 'कुसुमाक्का' आदी कथाही प्रचंड गाजलेल्या आहेत. 'सोनकिडा' या कथेला संवाद प्रागतिक विचारमंचाकडून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रज्ञाधर ढवळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)