राज्यस्तरीय प्रतिभावंत नारी सोहळा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्रचा उपक्रम !


मुंबई ( सचिन कुसनाळे ) :

नारी ही आदिशक्ती आहे.ती कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना त्यांचा कुठे तरी सन्मान झाला पाहिजे.तिला व्यासपीठ उपलब्ध करून सन्मान केला पाहिजे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाने राज्यस्तरीय प्रतिभावंत नारी सन्मान सोहळा दि.27/3/2022रोजी रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे ‌अध्यक्ष सौ.शालिनीजी मेखा तर प्रमुख पाहुण्या अर्चना भावसार मिस आयकाॅन 2019 च्या विजेता होत्या.


या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण विभागीय अध्यक्ष सौ.हर्षल साबळे ‌यांनी  दीप प्रज्वलन करून  केले. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्य संस्थापक नटराज मोरे सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा संदेश देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.‌कार्यक्रमाचे‌ प्रास्ताविक मंडळाचे‌ प्रसिद्धी प्रमुख श्री.सचिन कुसनाळे सर यांनी केले.मंडळाच्या कार्याची व विकासाची प्रगती कशी होत आहे,हे आपल्या ओघवत्या शैलीतून व्यक्त  केले.


 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अर्चना भावसार यांनी ‌महिलांचे आरोग्य व काळजी ‌या विषयावर ‌प्रकाश टाकला.आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात महिलांनी शारीरिकदृष्टीने सदृढ असणे ही काळाची ‌गरज आहे.महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या वतीने होत आहे ही  कौतुकाची बाब आहे.त्यामुळे महिलांना पुढील कार्यास  प्रेरणा व‌  प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन त्यांनी या वेळेस केले.


       या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या अनेक सर्व जिल्ह्यातून 55 महिलांना 'प्रतिभावंत नारी सन्मान' पुरस्काराने ‌सन्मानित   करण्यात आले. तसेच अर्चना भावसार यांना मंडळाकडून 'प्रतिभावंत नारी विशेष सन्मान'  देऊन सन्मानित करण्यात आले ‌.


       या सन्मान सोहळ्यासोबतच विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध ‌कला गुणदर्शनाचा कार्यक्रम ‌शिक्षिका भगिनींनी अतिशय उत्साहाने  मनोवेधकरित्या  सादर केले.विविध‌ नाट्यछटा, अभिनय,नृत्यकला, भावगीत  अभंग, काव्यवाचन अशा कितीतरी कलाविष्काराने सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली. 


या कार्यक्रमाविषयी ‌ सुषमा मानेकर व सौ उत्तरवार यांबरोबरच अनेक महिलांनी मंडळ व प्रतिभावंत नारी सन्मान सोहळा यांविषयी मनोगतातून कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.शालिनीजी मेखा यांनी आपल्या भाषणातून महिलांची शक्ती व प्रगती याविषयी कथन केले.

 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबाराव डोईजड, श्री योगेश गोतणारे,श्री तानाजी आसबे यांनी केले. आभार  मंडळाचे राज्य सचिव श्री.जोगमार्गे सर यांनी मानले. या कार्यक्रमास राज्य कार्यकारिणी तसेच विभागीय अध्यक्ष, जिल्हा तसेच तालुका  पदाधिकारी यांचे ही सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)