जागतिक वन्यजीव दिन मोठ्या उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय  वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 3 मार्च2022 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे शाळेच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून मोठ्या उत्साहात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला. यावेळी शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी सुरुवातीला वन्यजीव व पृथ्वी याचा संबंध असणाऱ्या पोस्टरच्या माध्यमातून मुलांना वन्यजीव म्हणजे जंगलात राहणारे जीव प्राणी वनस्पती कीटक पक्षी वृक्ष आणि एकूणच जीवन मात्र यावर माहिती सांगितली.


 जागतिक वन्यजीव दिन हा सन 2013 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आवाहनानुसार सर्वत्र साजरा केला जातो यात प्रामुख्याने वन्यजीवांचे रक्षण संवर्धन त्यांच्या अन्नसाखळीतील महत्त्व वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आजची स्थिती या विषयी जनजागृती करणे हा एकमात्र उद्देश होय तसेच आजच्या परिस्थितीला वन्यजीवांचे संवर्धन करण्याची का गरज आहे याविषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना रवी ढगे यांनी यावेळी केले.


नंतर शेळीचा अन्य पशूंचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचा पुष्पहार घालून विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नंतर चला संकल्प करू या वन्यजीवांचे संरक्षण करू या या घोषणा देण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, उपक्रम शील शिक्षक रवी ढगे ,देवबा होळकर, जयश्री बारोळे , माधुरी मलदोडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)