वडफळी येथे माहिलादिन सप्ताह कार्यक्रमाचे समारोप समारंभ संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

  



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी केंद्रातील जि.प.शाळा पांढरामाती आणि अंगणवाडी केंद्र पांढरामाती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.मागील वर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमात खंड पडला होता. परंतु त्याची कसर भरून काढत दुप्पट उत्साहाने या वर्षीचा कार्यक्रम सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पांढरामाती या ठिकाणी  पार पडला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमलता वळवी (अंगणवाडी सेविका बगदा ) मार्गदर्शक. अनिता वळवी (आशा पर्यवेक्षिका बगदा) प्रमुख पाहुणे इंदुला तडवी (अंगणवाडी सेविका वडफळी) केंद्रप्रमुख  सुभाष खैरनार सर ,लाखा महाराज, डॉ . रमेश वळवी   (वैद्यकीय अधिकारी जांगठी) हे व्यासपीठावर उपस्थित होते. मा.देसले साहेब गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा यांनी उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितले.


 राजमाता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगून महिलाचे दिनाचे महत्त्व सांगितले. महिलांचा सन्मान करण्याचा  संस्कार घरातूनच झाला पाहिजे.असे म्हणत प्रत्येक पालकांच्या डोक्यातील परंपरागत  विचारांची दारेही त्यांनी ठोठावली. कोणत्याही कामाची विभागणी ही लिंगभेदावर आधारित असता कामा नये. या त्यांच्या वाक्यावरून जमलेल्या प्रत्येक पालकाला परत एकदा स्वतःच्याच घरात डोकावून पाहण्यास भाग पाडले. 


अशा अगदी सहज,सोप्या आणि साध्या भाषेत  महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा मंत्र सांगितला.खैरनार सर केंद्रप्रमुख वडफळी यांनी सांगितले की,जागतिक महिला दिन हा प्रामुख्याने शहरी भागात, सुशिक्षित महिला एकत्र येऊन साजरा करतात. अनेक ठिकाणी कर्तुत्ववान महिलांचा सत्कारही केला जातो परंतू खरी गरज जिथे आहे तिथे मात्र याचा गंधही नसतो.  दिवस अन् रात्र फक्त काम आणि काम करणाऱ्या या खेड्यापाड्यातील महिलांसाठी तर हा दिवस दररोजच्या दिवसाप्रमाणेच एक दिवस असतो.  त्यांच्या कामाची, त्यांच्या त्यागाची कुठेच , कधीच आणि कोणीच दखल घेत नाही. ती स्वतःचे अस्तित्व विसरून कायम दुसऱ्यांसाठी जगत असते.  या तिच्या दैनिक कामाच्या चक्रव्यूहातून सुटका करून काही तासांसाठी का होईना पण तिलाही कुठेतरी मान-सन्मान मिळावा, तिला तिचे बालपण परत एकदा जगता यावे या दृष्टिकोनातून सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पांढरामाती  मधील हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन होय.


यावेळी महिला साठी संगीत खुर्ची, वक्तृत्व  वेशभूषा,ढोल वादन  या स्पर्धेचे आयोजन केले होते.प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक मिळणाऱ्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.


 यावेळी  सारीका दादर(पर्यवेक्षिका अंगणवाडी) मा.श्री .बिज्या वसावे (मुख्याध्यापक पांढरा माती),हेमलता वसावे( अंगणवाडी सेविका पांढरा माती),अनिता वळवी  (आशा पर्यवेक्षिका ,बगदा)दिलवरसिंग पाडवी ,(चापडी) ,संगीता बाई पाडवी (अंगणवाडी सेविका चापडी)अंजनाताई वळवी( पांढरा माती) ,लाखा महाराज, यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा .शिवव्याख्याते दिनकर दावभट (मुख्याध्यापक माथाचापडी) प्रास्ताविक श्री . अरविंद पाडवी ( इंजिनिअर ) तर आभार मा .श्री .बंडरे सर (मुख्याध्यापक अरेठी), यांनी केले.


स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून  आढाव सर (प्राथमिक शिक्षक चापडी, कमानी सर  , (मुख्याध्यापक चापडी)  प्रकाश गावीत सर (मुख्याध्यापक वंजारी पाडा) बटेसिंग तडवी (प्राथमिक शिक्षक पांढरा माती) यांनी काम पाहिले.यावेळी मा.श्री.भरतसिंग वळवी (प्राथमिक शिक्षक केवडी),छत्रसिंग वसावे (मुख्याध्यापक नानखोडकापाडा), रायसिंग तडवी (मुख्याध्यापक कोतवाल पाडा),विजय वसावे (मुख्याध्यापक पाटीलपाडा)  ,  वजऱया पाडवी  (अध्यक्ष शा.व्य.स पांढरामाती ) सोत्या वसावे, (सदस्य ग्रा.पं.वडफळी)  गोपाळ वसावे ,शिवला वसावे , मोग्‍या वसावे, गृपग्रामपंचायत वडफळी सर्व अंगणवाडी सेविका ,प्राथमिक आरोग्य केंद्र वडफळी वैद्यकीय पथक ,आशा स्वयंसेविका ,पांढरामाती गावातील तरुण वर्ग ज्येष्ठ, नागरिक , महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)