एस.पी.आर. जैन कन्या शाळेत विज्ञान अविष्कार उत्सव..

शालेयवृत्त सेवा
0

 



          

मुंबई (प्रतिनिधी उदय नरे) :

 दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी श्री पंडित रत्न चंद्रजी जैन कन्या शाळा-घाटकोपर येथे विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात कडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. यावर्षी थीम आहे - दीर्घकालीन भविष्यासाठी विज्ञान आणि प्रौद्योगिकीकरण एक दृष्टीकोण.


           देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे त्याच्या सर्व शोधांनी सामान्य माणसाला देखील फायदा झालेला आहे. याच फायद्याची समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच विज्ञानाची विचारसरणी जनमानसात रुजू करण्यासाठी, शिक्षण निरिक्षक उत्तर विभाग कार्यालयातील विषय साधन व्यक्ती श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम  व शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती नंदाबेन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाने 'वैज्ञानिकांचे अद्भुत रहस्य'हा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत 1 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत दररोज एक वैज्ञानिकाची माहिती देणारा विद्यार्थिनी चा व्हिडिओ युट्युब च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. 



       सी.वी.रमन-महेक पढीयार,विक्रम साराभाई-नंदिनी वाघरी,मेरी क्युरी-गायत्री प्रजापती,सत्येंद्रनाथ बोस-कविता दुबरिया,राकेश शर्मा-मयुरी रावल,होमी भाभा-मित्तल भानुषाली, जगदीश चंद्र बोस-आरुषी मीनात,सुनीता विल्यम्स-वृत्तीका झाला,आर्किमिडीज-वैशाली बेहरा,जेम्स वॉट-शीतल चावडा, थॉमस अल्वा एडिसन-दिशा राठोड,चार्ल्स डार्विन-नियती  जेठवा,अलेक्झांडर फ्लेमिंग-रिया चव्हाण,डॉक्टर वेंकी रमाकृष्णान -संध्या  यादव,गॅलेलियो गॅलिली-दृष्टी पटेल, स्टीफन हॉकिंग-रिया राठोड,नील्स भोर-श्वेता मोरया,जॉन डाल्टन-सेजल राठोड,रॉबर्ट हूक-तृप्ती चुडासमा,जेम्स वॉटसन -सिमरन राजभर,अर्नेस्ट रुदरफोर्ड-राजल बारोट,हरगोविंद खुराना-वृतिका झाला,मायकल फॅरेडे-दिशा दाढी,लिओनार्दो द विंची-हिरल आहीर,बीभा चौधरी-रिया गुप्ता,अल्बर्ट आईन्स्टाईन-झील व्यास,आयझॅक न्यूटन-पूर्वी लाखानी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम-रिया राठोड,राष्ट्रीय विज्ञान दिवस स्पीच -भक्ति  लोडाया अशा प्रकारचे व्हिडिओ शाळेचे शिक्षिका श्रीमती प्रमोदिनी पटेल, श्रीमती दीप्ती देसाई व श्रीमती दक्षा रोकडे यांनी तैयार केले.


        राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचे महत्त्व   सांगणारे विज्ञान गीत, छोट्या छोट्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. तसेच विद्यार्थीनींचे विज्ञान दिन मनोगत सादर करण्यात आली.


        इयत्ता पाचवी व सहावी चा विद्यार्थिनि  साठी 'जैवविविधता' या विषयावर कलरिंग कॉम्पिटिशन आणि इयत्ता सातवी आणि आठवी चा विद्यार्थिनि साठी 'मंग्रोव मध्ये जैवविविधता'हा विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा ठेवण्यात आली. इयत्ता नववी च्या विद्यार्थिनी साठी विज्ञान स्वयं रचीत कविता बनविण्याची स्पर्धा ठेवण्यात आली.


        या कार्यक्रमात शिक्षण निरिक्षक उत्तर विभाग यांच्या विषय साधन व्यक्ती  माननीय श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम यांनी उपस्थिती दिली.त्यांचे स्वागत मा. मुख्याध्यापिका श्रीमती नंदाबेन यांनी केले .विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देऊन सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.



      या उपक्रमात इनरव्हील क्लब ऑफ मुंबई घाटकोपर द्वारे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी ऐरोली इथे मेंग्रॉव फॉरेस्ट विजिट करण्यात आली.ज्याच्यात इयत्ता सातवी व आठवीचे 19 विद्यार्थ्यांनी व शाळेचे शिक्षिका दक्षा रोकडे यांनी भेट घेतली.

        अशा प्रकारे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून एस.पी.आर.जैन कन्या शाळेतील विज्ञान अविष्कार उत्सव नियोजनपूर्वक साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)