उन्हाची वाढती तिव्रता लक्षात घेता नांदेड जिल्हयातील शाळा सकाळ सत्रातच भरविणार.. - जिल्हा परिषद अध्यक्षा मा.मंगाराणी अंबुलगेकर

शालेयवृत्त सेवा
0

 



इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ' इब्टा ' पदाधिकार्‍यांनी दिले निवेदन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

उन्हाची वाढती तिव्रता, अनेक शाळांत पंखे व विद्युतीकरणाचा अभाव, बस संपामुळे उन्हात विद्यार्थ्यांची होणारी होरपळ या व अन्य बाबींची जिप पदाधिकारी, प्रशासन  म्हणून आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही विद्यार्थी, शिक्षक व पालकांसोबतच आहोत . त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नांदेड जिल्हयातील सकाळ सत्रातच सत्रातच भरविणार असे सुस्पष्ट आश्वासन नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा मा.मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिले व दरवर्षी या बाबत का व कोण संभ्रमता निर्माण केली जाते ? याबाबत नाराजीही व्यक्त केली.


          इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर मॅडम, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ. वर्षा ठाकूर-घूगे मॅडम व शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ. सविता बिरगे मॅडम यांची सदिच्छा भेट घेवून महिला उपरोक्त कर्तबगार व सक्षमपणे पद सांभाळणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा संघटनेच्यावतीने ह्रदय सत्कार करून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या उपरोक्त निवेदनही देण्यात आले.



          यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ.सविता बिरगे मॅडम म्हणाल्या की, उन्हाची तिव्रता वाढती आहे अन उत्तरोत्तर ती वाढतच जाणार आहे. आपल्या उल्लेखाप्रमाणे आपल्या अनेक शाळांत पंखे व विद्युतीकरणाचा अभाव आहे. बसच्या संपामुळे विद्यार्थ्यांची उन्हात पायपीट होते आहे. याची प्रशासन म्हणून आम्हाला पूर्ण जाणिव आहे. प्राथमिक शिक्षण विभागने या बाबत कोणताही सुचना दिलेल्या नाहीत परंतू तात्काळ मा.अध्यक्षा, मा.मुकाअ व मा.शिक्षण सभापती महोदयांशी योग्य ती चर्चा करुन दरवर्षीप्रमाणे सकाळ सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय विनाविलंब घेवू असे स्पष्ट आश्वासनही दिले.


            सदरील शिष्टमंडळात इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, कार्याध्यक्ष मा.बबनराव घोडगे, सरचिटणीस मा.निलेश गोधने, मा.विजयकुमार गजभारे, मा.रामदास गोणारकर, मा.गंगाधर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.माधव कांबळे, अंबुलगेकर, मा.मिलिंद जाधव, मा.जगन्नाथ दिंडे, मिलिंद राऊत,  मा.साहेबराव डोंगरे, मा.नाथा केंद्रे, मा.रामदास वाघमारे गोणारकर, मा.मिलिंद राऊत, मा.मारोती वाढवे, मा.जितेंद्र गवळे, मा.तुकाराम वाठोरे व अन्य पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)