रनाळे जि.प.शाळेत होलिकोत्सव नृत्य सादरीकरण. .

शालेयवृत्त सेवा
0

  



शिकू आनंदे : उपक्रमाची प्रभावी अमलबजावणी


नंदुरबार ( गोपाल गावित )  :

"शिकू आनंदे " ( Learn with Fun ) या उपक्रमाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत " शिकू आनंदे " हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळ सत्रात एरोबिक्स, नृत्य गीतगायन व नैसर्गिक रंगनिर्मिती विविध उपक्रम राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.नृत्य उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रनाळे ता.जि.नंदुरबार येथील  कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका उज्वला पाटील यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे होळी सणाचा अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या  सर्व नातेवाईक कौटुंबिक जीवनाच्या आनंदमय वातावरणात होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. 



सातपुड्याच्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी होळी मातेची पुजा केली जाते.आदिवासी होळी,ढोल नृत्य सांस्कृतिक सणाचे महत्त्व सातपुड्यातील होलिकोत्सव सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. होलिकोत्सव साऱ्यांचे विशेष आकर्षण असतो. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये होळी सण उत्सव विविध परंपरेने साजरा केला जातो व त्यामागील भावना व चालीरीती यामध्ये विविधता दिसून येते.होळी सण साजरा करताना वेगवेगळ्या पद्धती व रूढी परंपरा आढळून येतात.



 होलिकोत्सवात होळी पेटवून खोबरे,डाळ्या, मुरमुरे, गुळ, खजूर,हार, कंगन आधी पदार्थ वापरले जातात. आदिवासी संस्कृतीची ओळख करून दिली. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा छायाबाई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील, शिक्षिका रेखा मुरकेवार, उज्वला पाटील, मंगेश वसावे यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी  शाळेत शिकु आनंदे या उपक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा, पारंपारिकता ढोल, बिरीचा मधुर सूर घेत मोरपीस मोरखी, दणका डोको, होळी सेवेकरी आदी नृत्यकलाकार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जल्लोषात उत्स्फूर्तपणे नृत्य सादरीकरण केले. 



जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एफ ठाकरे, केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनीही फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका या व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ४७ देशांमध्ये कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शिकू आनंदे कार्यक्रमाचे राज्य समन्वयक विक्रमजी अडसुळ व ज्योती बेलवले मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)