हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे शिक्षणाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार!

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद-  जालना जिल्हा परिषदेच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.मंगल धुपे मॅम शुक्रवारी रोजी जालना येथे पदभार स्वीकारल्यानंतर तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे नूतन निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी व मा.उपशिक्षणाधिकारी मा.प्रियाराणी पाटील मॅम यांनी आज औरंगाबाद येथे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांच्या राहते घरी सदिच्छा भेट दिली. 


 शासन परिपत्रक नुसार  पदोन्नती मिळालेल्यानां शिक्षणाधिकारी पद मिळाले आहे. त्याबद्दल हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फ त्यांचा जँगी सत्कार करण्यात आला. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नूतन शिक्षणाधिकारी (निरंतर) मा. प्रियाराणी पाटील मॅम आणि जालना जिल्हाच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.मंगल धुपे मॅम यांचा  परंपरा नुसार पुस्तक, शाल आणि एक मोमेंट देऊन सत्कार केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


या वेळी मॅम नी फराळ आणि फळाचा आस्वाद घेतला  आणि  नवीन जुनी आठवणी ला उजाळा दिला तसेच शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा केली व शिक्षणाला प्रथम महत्व द्यावे असे आवाहन ही केले तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात दिलेलं योगदान अभिनंदनीय आहे. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे सय्यद अब्दुल रहीम सर तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर आदींची उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)