डायट संस्थेच्या प्रलंबित वेतन बाबत खासदार डॉ.हिनाताई गावीत यांना निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार दि.३ ( गोपाल गावीत ) :

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. हिनाताई गावीत व आमदार विजयकुमार गावीत साहेब नंदुरबार विधानसभा यांना निवेदन देण्यात आले आहे.


शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ( डायट ) मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन नियमित होण्यासाठी उपोषणाबाबत राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ( डायट ) मध्ये कार्यरत राज्य शासनाद्वारे नियुक्त नियमित अधिकारी व कर्मचारी असूनही आमचे वेतन मागील २ वर्षापासून अनियमित होत आहे. 


मा. संचालक , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, मा.आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण, तसेच मा. मुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री व मा. शालेय शिक्षण मंत्री महोदय या सर्वांना वारंवार निवेदन देवून व प्रत्यक्ष भेटून वेतनाच्या संदर्भात वस्तूस्थिती विषद करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही तोडगा निघालेला नाही. वेतनाचा प्रश्न अजूनही दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे . सद्यस्थितीत मागील ४ महिन्यापासून वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जगणे अतिशय अवघड झालेले आहे. 


शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी सात्यत्याने काम करणाऱ्या या शासकीय संस्थेकडे शासनाचेच दुर्लक्ष होत आहे. अश्या स्थितीत आमच्या समोर उपोषणास बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून दिनांक २ मार्च २०२२ पासून मा.आयुक्त शिक्षण पुणे या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे आम्ही निश्चित केलेले आहे .


 महाराष्ट्रातील एकूण ३४ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) तसेच विद्या प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी टप्प्य टप्प्याने साखळी उपोषणास बसणार आहोत तरी आपणास विनंती आहे की , आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न व सहकार्य करावे.याकरिता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) चे प्राचार्य डॉ जगराम भटकर, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.रमेश चौधरी, डॉ.वनमाला पवार, डॉ.राजेंद्र महाजन,संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव, अनिल सोनवणे, प्रविण चव्हाण, गिरीश गावीत आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)