जि प प्रा शाळा दहेगाव (ची) येथे छत्रपती संभाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेस्मृतिदिन व जागतिक महिला दिन साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट येथून जवळच असलेल्या चिखली( बु.) केंद्रा अंतर्गत जि प प्रा शाळा दहेगाव (ची.)येथे छत्रपती संभाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रथम नागरिक सरपंच अनिताताई मडावी यांनी अध्यक्षस्थान भूषविले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अंगणवाडी सेविका ललिताताई मडावी तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कमलताई मेश्राम तथा आरोग्य आशा वर्कर सौ यशोदाबाई मेश्राम तसेच जानकीबाई मडावी, संध्या मेश्राम, महेश शेख, यांची उपस्थिती होती.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार बाविस्कर सर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनिता ताई मडावी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अंगणवाडीसेविका सौ ललिताबाई मडावी व सौ यशोदाबाई मेश्राम यांनी पण सावित्रीबाई फुले यांच्या विविध कार्याची माहिती दिली.


 सर्व  उपस्थितांची भाषणे झाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शालेय विद्यार्थिनी कु. ममता सिडाम, प्राजक्ता मिराशे, संध्या ,पूजा सिडाम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार बाविस्कर सर यांनी केले तर शेंडे संतोष यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संजय मुत्तेपवार   यांनी परिश्रम घेतले .



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)