निळा बीटअंतर्गत केंद्रस्तरीय प्रशिक्षणास प्राचार्य रवींद्र आंबेकर सर यांनी दिली भेट..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

बीट निळा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी चे प्रशिक्षण राष्ट्रगीताने उत्फूर्त रित्या आणि सर्व शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वी झाले.


सुलभक म्हणून श्रीमती धोत्रे मॅडम आणि संजय राठोड सर यांनी परिपूर्ण माहिती दिली. प्रथम सत्रात एम.जी.एम विद्यालयाचे अध्यक्ष आणि प्राचार्या मॅडम,केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.


जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड चे प्राचार्य रवींद्र आंबेकर साहेब,धुमाळ सर,यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.आजच्या प्रशिक्षणात सर्व अंगणवाडी सेविका आणि इयत्ता पहिली ते पाचवीला अध्यापन जरणारे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

      

उपहार आणि चहा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पालक मेळावा आणि त्यातील सात स्टॉल लावून लेझिम च्या तालात सरपंच पोहरे सर,अध्यक्ष पडगीलवार सर,नागरिक म्हणून बेळगे सर,बाळासाहेब नरवाडे सर,भुयारे सर,बुयरे सर, यम्मलवाड सर,चिवटे सर, अनमोड सर यांनी कृतियुक्त सहभाग घेतला तर विध्यार्थिनी म्हणून गुडेवार मॅडम,माता पालक म्हणून कंधारकार मॅडम,पिता पालक म्हणून खाडे सर तर विध्यार्थी म्हणून देवराव नरवाडे सर,यांनी पहिल्या स्टॉल पासून सातव्या स्टॉल पर्यंत प्रत्येक टेबल वर असलेली कृती खेळीमेळीच्या वातावरणात पर पाडली. सात टेबल वरील सर्व टीम ने उत्कृष्ट सादरीकर केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)