प्राथ.शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पारदर्शक करा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रहार शिक्षक संघटनेने निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 





नंदुरबार (प्रतिनिधी) :

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी बदलीसाठी निवेदन देण्यात आले आहे. 


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय ऑनलाईन, पारदर्शक होणेबाबत विनंतीपूर्वक निवेदन नवीन बदली शासन निर्णयातील दि.७/४/ २०२१ रोजीच्या निकषांप्रमाणे अवघड क्षेत्र निश्चित करतांना मागील २०१८ व २०१९ वेळीचे अवघड क्षेत्र कायम ठेवण्यात यावे. नंतर प्रशासनास उचित वाटेल व नवीन बदली धोरण निकषांनुसार येणारी गावे अवघड करावीत. 


या प्रक्रियेत पारदर्शकता व वस्तुनिष्ठता जपावी. तसेच अवघड क्षेत्र निवडल्यानंतर अंतिम करण्यापूर्वी जाहीर करावे व हरकती घेण्यास चार दिवसांचा वेळ द्यावा. बदली पोर्टलला चुकीची माहिती अपडेट करुन शासनाची दिशाभुल करुन बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. बदली पात्र शिक्षकांची अवघड व सोपे असे क्षेत्रनिहाय सेवाज्येष्ठतेनुसार यादी जाहीर करणे. बदली प्रक्रियेपूर्वी समाणिकरणासाठी सोडावयाच्या शाळा व पदे , समायोजित होणारे शिक्षक यांच्या याद्या लावणे. सद्यस्थितीत प्रस्तावित सुधारणा अवघड व सोपे क्षेत्र घोषित करणे. 


बदलीपात्र संवर्ग -१ व संवर्ग -२ अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांची संवर्गनिहाय यादी लावणे व त्यांच्या प्रमाणपत्रांची समितीमार्फत काटेकोरपणे तपासणी करून दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर नवीन बदली शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे प्रत्येकवेळी हरकती घेण्यासाठी वेळ देणे. बिंदु नामावली मंजुर करणे मुख्याध्यापक, पदवीधर , विषयशिक्षक, प्राथमिक शिक्षक अशा सर्व केडरचे रोस्टर संबंधित कार्यालयाकडून मंजुर करणेबाबत कार्यवाही करावी. रिक्त जागांवर पदोन्नत्या आपल्या जिल्हयात मुख्याध्यापक , पदवीधर , विषयशिक्षक या पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बदली प्रक्रियापूर्वी पदोन्नतीने रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. बदली प्रक्रिया समुपदेशन संगणकीय ऑनलाईन पद्धतीने राबविली जावी, त्यात राजकीय हस्तक्षेप नसावा , पारदर्शकता असावी. 


प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सादर ना. बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण , महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, अॅड. सिमाताई पद्माकरजी वळवी अध्यक्षा जि.प, अॅड.रामभैय्या चंद्रकांतजी रघुवंशी उपाध्यक्ष जि.प, अजितदादा सुरुपसिंगजी नाईक शिक्षण सभापती, विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांना देण्यात आले आहे.प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या निवेदनात सह्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)