अंबापुर जि.प.शाळेत जागतिक महिला दिन साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार दि.८ (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अंबापुर येथे जागतिक महिला दिनानिमित्त वर्षभर कोविड काळात गावात लसीकरण करतांना मदत करणाऱ्या आशा सुपरवायझर वैशाली खंडारे,रंजना महाले आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. शाळेला नेहमी मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका सीता चौरे, रंगू बागुल यांचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी मदतनीस सुशीला बागुल, जया चौरे यांचा सत्कार करण्यात आला.


तसेच जि.प.शाळा हरिपूर येथील उपक्रमशील शिक्षिका रेणुका चव्हाण, के.डी.गावित अंबापुर शाळेच्या शिक्षिका रेश्मा गावित , जि.प.शाळा अंबापुर येथील उपक्रमशील शिक्षिका सपना हिरे या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी  शाळेतील मुख्याध्यापक रमेश पवार , शिक्षक भागवत धनगर, देविदास कोकणी, दातक्या वळवी, सपना हिरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी देविदास कोकणी फलक लेखन केले. भागवत धनगर यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार दातक्या वळवी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)