अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर !

शालेयवृत्त सेवा
0



 शिक्षक प्राध्यापकांच्याही साहित्यसेवेचा होणार सन्मान !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य प्रकाराला मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


 या साहित्यकृतीना पुरस्कार झाला जाहिर :

 'यशपुष्प ' (डॉ. आशुतोष रारावीकर -मुंबई ) 'खोसाटा ' (डॉ. प्रभाकर शेळके -जालना ) 'कैवार '(डॉ. शिवाजी शिंदे - सोलापूर) 'हिरवं सपनं ' (डॉ. प्रा. दर्शना देशमुख -लातूर ) 'आकाशविना ' (विना रारावीकर - मुंबई ) 'मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ' (हबीब भंडारे - औरंगाबाद ) 'उमंग ' (व्यंकटेश काटकर - नांदेड ) 'आयुष्याच्या कॅनव्हास वरील अस्वस्थ रेघोट्या ' (माधुरी चौधरी - औरंगाबाद ) 'समतेच्या डोहाकाठी ' (चंद्रकांत कदम - नांदेड ) 'आम्ही फुले बोलतोय ' (भारत सातपुते - लातूर ) 'जीवन घडताना ' (मनोहर भोळे - नांदेड ) 'उन्हात घर माझे ' (नितीन भट -अमरावती ) 'शब्दाच चांदणं ' (माया तळणकर नांदेड ) 'उजेड' (सुजाता पोपलवाड - नांदेड ) 'गावगंध ' ( मिलिंद जाधव -नांदेड ) 'शब्दक्रांती ' (उत्तम कानिंदे व रमेश मुनेश्वर -नांदेड ) 'आता लढलेच पाहिजे ' (बालिका बरगळ -नांदेड ) तुकोबाच्या कुळांचा वंश (संतोष कांबळे - नाशिक ) डोह तळ (मारुती कटकदौंड -सोलापूर ) शिंपल्यातील मोती (डॉ. संगीता अवचार -नांदेड) आठवणींच गाठोड (मोतीराम राठोड ) 


 हे पुरस्कार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी पीपल्स कॉलेज नांदेड परिसरात स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मंगला फुलारी , उद्घाटक ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम , प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे व मंडळाचे राज्याध्यक्ष मारुती मुंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


पुरस्कार वितरण सत्राचे सूत्रसंचालन कादंबरीकार चंद्रकांत चव्हाण हे करणार आहेत व आभार कवी सदानंद सपकाळ करतील लागलीच कवीसंमेलन या दुसऱ्या सत्रात सुरुवात करण्यात येणार आहे. कवीसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका सिंधुताई दहिफळे हिंगोली हे राहणार आहेत व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील लोकप्रिय कविकट्टा संचालक अशोक कुबडे हे राहणार आहेत. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नरेंद्र धोंगडे व आभार उषाताई ठाकूर या करणार आहेत. कवी संमेलनासाठी नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे व कविसंमेलनाचे नियोजन मंडळाचे राज्य सदस्य पंकज कांबळे , विनय कोंडा , आशिष कुमार आठवले व सदानंद सपकाळे हे करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)